spot_img
ब्रेकिंगआता 'ही' माझी शेवटची निवडणूक; माजी मंत्री शिवाजी कर्डिले स्पष्ट्च बोलले..

आता ‘ही’ माझी शेवटची निवडणूक; माजी मंत्री शिवाजी कर्डिले स्पष्ट्च बोलले..

spot_img

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:-
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लवकर शेतकऱ्यांना दुधाच्या जोडधंद्यासाठी मदत व्हावी यासाठी पशुखाद्य कारखाना टाकण्यासाठी पुढाकार घेणार आहे, या माध्यमातून शेतकऱ्यांना 50 टक्के सवलतीच्या दरात खाद्य उपलब्ध होईल जिरायत दुष्काळी भागाला न्याय देण्याचे काम माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे ही त्यांची शेवटची निवडणूक असून त्यांनी आपल्यासाठी गेली 25 वर्ष त्याग, संघर्ष केला आहे, आता आपल्यावर परतफेड करायची वेळ आली आहे, आजची सभा ही पावसात झाली असून ते आता नक्कीच निवडून येणार आहे आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमच्यावरही आहे त्यांनी देखील प्रत्येक निवडणुकीत मतदारसंघ बदलून निवडून येण्याचे काम केले, ही बाब सोपी नाही असे प्रतिपादन मा. खा. सुजय विखे पाटील यांनी केले.

नगर तालुक्यातील कापूरवाडी पिंपळगाव उज्जैनी पोखर्डी ते छत्रपती संभाजीनगर महामार्गपर्यंत रस्ता मजबुतीकरण कामाचा शुभारंभ माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, बाजार समितीचे चेअरमन भाऊसाहेब बोठे, व्हाईस चेअरमन रभाजी सुळ, हरिभाऊ कर्डिले, संतोष म्हस्के, विलास शिंदे, कैलास पठारे, शिवाजी दुशिंगे, गोविंद वाघ, इस्माईल शेख, आदेश वाघ, मिनीनाथ दुशिंगे, मोनिका आढाव, सुभाष आढाव, बाळासाहेब वाघ, जगन्नाथ मगर, प्रयाग लोंढे, सुधीर भापकर, भाऊसाहेब ठोंबरे, मंजाबापू घोरपडे, दीपक कार्ले, आदेश भगत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

मा. खा. सुजय विखे पाटील पुढे बोलताना म्हणाले, मला कधीच पदाचा मोह नव्हता, मी राजकारणातून युवा पिढीच्या उज्वल भविष्यासाठी काम करायचे स्वप्न पाहिलेले असून नगर जिल्ह्याचे चित्र बदलायचे आहे, मी मागील निवडणुकीमध्ये विकास कामाचे दिलेले शब्द पूर्ण केले, तेव्हाच दुसऱ्या निवडणुकीला जनतेसमोर मत मागायला आलो होतो, मात्र दुधाच्या अनुदानाचे सॉफ्टवेअर नवीन होते, त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण झाली आता खटाखट पैसे येतात, आता कांद्याला देखील चांगला बाजार आहे, मी खचणारा माणूस नसून माझी ओळखी पदापेक्षा मोठी आहे, मी लोकांच्या मनामध्ये विकास कामाच्या माध्यमातून स्थान निर्माण केले आहे, नगर तालुक्याचे चित्र माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी विकास कामातून बदललेले आहे, गेल्या 25 वर्षात शेती, डीपी, शाळा खोल्या, वाड्यावस्त्यांपर्यंत रस्त्यांची कामे केली असल्यामुळे ते खऱ्या अर्थाने नगर तालुक्याचे शिल्पकार आहे मी पिंपळगाव उज्जैनी गावात विकास कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला तरी देखील मला लोकसभेमध्ये 300 मते कमी पडली, मात्र मी कधीही विकासाच्या कामात राजकारण करत नसून जनतेचे प्रश्न सोडविणे हाच माझा प्रयत्न आहे असे सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

आता माझी ही शेवटची निवडणूक
राजकारणामध्ये अपयश येत असते. आता माझी ही शेवटची निवडणूक आहे तुम्ही मला गेली 25 वर्ष भरपूर दिले, वयाचा विचार केला पाहिजे ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव व मागणीनुसार लढणार आहे गावातील गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून एकमेकांमधील मतभेद विसरून काम करा, माझ्याकडे कोणी आले तरी त्यांचे काम केले जाते गेल्या ५ वर्षांमध्ये मी आमदार नसलो तरी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे मला आमदार असल्यासारखे वाटले, विकास कामे करण्याची चिंता तुम्ही करू नका ती जबाबदारी माझी आहे.
– माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर हादरलं! ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार’, नराधमाने शेतात नेलं अन्..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय...

गणेशभक्तांना दिलासा! विधिमंडळात मोठी घोषणा; वाचा एका क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून...

नगरात खळबळजनक प्रकार! टी-शर्टला धरून उचलले, डोक्याला लावला कट्टा अन्..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गणेशवाडी, स्वस्तिक चौक येथील व्यापारी हिमेश दिलीप पोरवाल (वय 31)...

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील ‘तो’ शापित ‘युटर्न’; एकाच जागेवर गेले अकरा जीव..

पारनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पारनेरमधील जातेगाव फाट्यावरील एका युटर्नवर सागर सुरेश धस...