spot_img
महाराष्ट्रआता ‘भाजप मुक्त जय श्रीराम’ करावा लागेल, उद्धव ठाकरेंचा घणाघात

आता ‘भाजप मुक्त जय श्रीराम’ करावा लागेल, उद्धव ठाकरेंचा घणाघात

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : राम कुठल्याही व्यक्तीची किंवा पक्षाची मालमत्ता नाही. तशी मालकी केली तर भाजपमुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल.

भाजपमुक्त श्रीराम. नुसतं जय श्रीराम नाही. भाजप मुक्त जय श्रीराम. असे प्रतिपादन ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेना ठाकरे गटाचं नाशिकमध्ये सातपूर परिसरातील डेमोक्रोसी हॉलमध्ये राज्यव्यापी महाधिवेशन पार पडत असून या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी हा घणाघात केला. काल सर्व अंधभक्त तिकडे जमले होते. त्यांचं ज्ञान आणि बुद्धीचा आदर करतो.

कुणी तरी एकाने मोदींची बरोबरी शिवाजी महाराजांशी केली. आजचे शिवाजी महाराज म्हणजे पंतप्रधान. अजिबात नाही. त्रिवार नाही. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज राम मंदिर उभं राहूच शकलं नसतं. तुम्ही तिकडे बसला ते केवळ शिवाजी महाराजांमुळेच नाही तर ते ऐऱ्या गबाळ्याचं काम नव्हतं असंही ठाकरे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...