spot_img
ब्रेकिंगPolitics News: थांबण्याचे नाव नाही!! ८४ उलटली ना...: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

Politics News: थांबण्याचे नाव नाही!! ८४ उलटली ना…: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साधला निशाणा

spot_img

कल्याण। नगर सहयाद्री
सरकारमध्ये काम करणारे ५८ पासून ७५ पर्यंतच्या वयात निवृत्ती घेतात; मात्र काहीजण ८४ वर्षे उलटली तरी थांबण्याचे नाव काढत नाहीत. आम्हालाही लोकांसाठी चांगले निर्णय घेता येतात, हे आम्ही सिद्ध केले आहे. मात्र काही जण ऐकतच नाहीत; हट्टीपणा करत राहतात, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कल्याणला रविवारी कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी पवार यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा वाचाळवीर असा उल्लेख करताना आरक्षणाचा मुद्दा सोडविण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही. मी लाभासाठी नव्हे, तर बहुजनाच्या कल्याणासाठी सरकारमध्ये सहभागी झालो आहे, असे पवार यांनी नमूद केले.

कल्याण जिल्हा घोषित करण्याची मागणी सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी, ग्रामीण भागातील ७० ग्रामपंचायतींचे वेगाने नागरिकरण होत असल्याने याची स्वतंत्र नगरपरिषद घोषित करण्याची मागणी केली. उल्हासनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पप्पू कलानी आणि ओमी कलानी यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा; वादग्रस्त मोहोळ विरुद्ध राक्षे लढतीची चौकशी होणार

योगेश दोडके यांची माहिती / प्रा.विलास कथुरे यांची प्रमुखपदी नियुक्ती अहिल्यानगर / नगर सह्याद्री : अहिल्यानगरमध्ये...

तब्बल १९ बोगस कंपन्यांमधून कोट्यवधी लुटले; मोबाईल चालू तरी पोलिसांना सापडेना संदीप अन् त्याची टोळी…

 पोलीस अधिकार्‍यांच्या भूमिकाच संशयास्पद स्पेशल रिपोर्ट / शिवाजी शिर्के - सह्याद्री मल्टीनिधी ही कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत...

शनिशिंगणापूर देवस्थानचा मोठा निर्णय; शनिदेवाला ब्रँडेड तेलानेच करावा लागेल अभिषेक!

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एक मार्च २०२५ पासून...

‘सुपा, पारनेर, बेलवंडीत दरोडा टाकणारे जेरबंद’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- सुपा, पारनेर, बेलवंडीत परिसरात घरफोडी करणारे अट्टल दरोडेखोरांना, स्थानिक गुन्हे...