spot_img
अहमदनगरनीलेश लंके यांच्या गरीबीचा पर्दाफाश ; पैशाची पाकीटे वाटताना लंके समर्थक ॲड....

नीलेश लंके यांच्या गरीबीचा पर्दाफाश ; पैशाची पाकीटे वाटताना लंके समर्थक ॲड. राहुल झावरे व दोघांना रंगेहात पकडले

spot_img

कोतवाली पोलिस ठाण्यात आदर्श आचारसंहितेच्या भंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

अहमदनगर | नगर सह्याद्री

नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांच्या समर्थकासह दोघांना नगर शहरातील एका हॉटेलच्या रुममध्ये पैशाची पाकीटे वाटप करताना भरारी पथकाच्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडले. या तीघांकडून प्रत्येकी वीस हजार रुपयांची तीन पाकीटे आणि दोन मोकळी पाकीटे जप्त करण्यात आली. याबाबत नगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात आचारसंहितेच्या भंगासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, नगर शहरातील स्टेशन रोड भागातील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्याशी संबंधीत असणार्‍या हॉटेल यश ग्रँड येथील रुम क्रमांक ४०२ मध्ये मतदार आणि मतदारांशी संबंधीत गावागावातील काही नेत्यांना पैसे वाटप केले जात असल्याची गुप्त माहिती निवडणूक पथकातील भरारी पथक क्रमांक पाच यांना मिळाली होती. त्यानुसार पथकातील अधिकार्‍यांनी खातरजमा केली आणि हॉटेलमधील रुम क्रमांक ४०२ मध्ये धाड टाकली. धाड टाकली त्यावेळी त्या रुममध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांचे समर्थक ऍड. राहुल बबन झावरे (रा. वनकुटे, ता. पारनेर) हे स्वत: उपस्थित होते.

याशिवाय अन्य दोघांमध्ये अनिकेत राजू यादव (रा. भिंगार, नगर) व विलास गोविंद चिपडे (रा. मुंबई) यांचा समावेश आहे. यातील एकजण स्थानिक यु- ट्युब वृत्तवाहिनी चालविणार्‍याशी निगडीत असल्याची माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली.
महसूल- पोलिस अधिकार्‍यांचा समावेश असणारे निवडणूक आयोगाचे भरारी पथक हॉटेलच्या रुममध्ये धडकताच या पथकासोबत राहुल झावरे याने वाद घातला आणि पाहून घेण्याची धमकीही दिली. मात्र, पथकातील अधिकार्‍यांनी खमकी भूमिका घेतली आणि कारवाई केली. या कारवाईत वीस हजार रुपयांची तीन पाकीटे (साठ हजार रुपये) जप्त करण्यात आली.

दरम्यान, नगर लोकसभा मतदारसंघात गरीब उमेदवार विरुद्ध श्रीमंत उमेदवार असा प्रचार चालू होता. त्यात लंके हे गरीब तर विखे हे श्रीमंत उमेदवार दाखवले जात होते. भरारी पथकाच्या या कारवाईत थेट मतदारांना पैसे वाटप करणारी पाकीटेच जप्त करण्यात आली. दरम्यान, या घटनेत आणखी कोणाचा समावेश आहे किंवा कसे याचा तपास करावा लागणार असल्याचे कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले.

निवडणूक वर्गणी, मदतीचे ढोंग आले अंगलट

नीलेश लंके यांच्या उमेदवारीसाठी आणि त्यांच्या निवडणुकीसाठी सामान्य जनता पैसे देते आणि त्यांच्या पैशावर लंके हे निवडणूक करत असल्याचा कांगावा ॲड. राहुल झावरे व समर्थकांनी सोशल मिडियावर गेल्या काही दिवसात चालवला होता. जनतेने खरेच हे पैसे दिले असतील तर मग लंके समर्थक समजल्या जाणार्‍यांकडून तेच पैसे मते मिळविण्यासाठी वाटले गेल्याचे आता पुढे आले आहे. गरीब उमेदवार असं सोंग पांघरुन लंके व त्यांच्या समर्थकांकडून पैसे वाटप झाल्याचे आता पुराव्यासह समोर आल्याने लंके यांचा खरा चेहरा समोर आल्याचे मानले जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेच्या पडताळणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) शपथविधीनंतर...

शनिवारी शटडाऊन, नगर शहरात पाणीपुरवठा बंद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी शहर पाणी योजनेवर शनिवारी शटडाउन घेण्यात...

कोणी लाईट देता का लाईट?; महावितरणचे रोहित्र असून अडचण नसून खोळंबा

पिंपरी जलसेन | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील पिंपरी जलसेन येथील शेतकर्‍यांना शेतीपंप व घरगुती वीज...

राणी लंकेंना ओव्हर कॉन्फिडन्स नडला; कोण काय म्हणाले पहा…

लंके यांच्या टीकेवर अर्चना दाते यांचे उत्तर | ४० वर्षांची कारकीर्द पहा मग समजेल पारनेर...