spot_img
अहमदनगरनीलेश लंकेंचा उमेदवारी अर्ज दाखल; शिवसेनेचा पदाधिकारीही लोकसभेच्या रिंगणात!, चर्चांना उधाण...

नीलेश लंकेंचा उमेदवारी अर्ज दाखल; शिवसेनेचा पदाधिकारीही लोकसभेच्या रिंगणात!, चर्चांना उधाण…

spot_img

स्थानिक पदाधिकार्‍यांची उपस्थिती
अहमदनगर | नगर सह्याद्री
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. जनता आता विखे यांना कंटाळली आहे. मतदार संघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वसामान्य जनता माझ्या सोबत आहे. त्यामुळे मी या निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी होईल असा आत्मविश्वास नीलेश लंके यांनी व्यक्त केला. दरम्यान शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी दाखल केलेल्या अर्जामुळे शिवसेनेत बंडखोरी झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

नीलेश लंके हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात साधेपणाने दाखल करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी कुटुंबियांचे आशिर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास रवाना झाले. त्यानंतर नगरमध्ये मानाच्या श्री विशाल गणपती मंदिर येथे आरती करुन दर्शन घेतले.

तसेच सर्जेपुरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी महाविकास आघाडीच्यावतीने त्यांना गदा भेट देण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर स्थानिक पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल केला.

लंके म्हणाले, अंध, अपंग तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांचे नेते अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर अर्ज दाखल करण्यात आला असून हनुमानरायांकडे मी प्रार्थना केली की नगर दक्षिण मतदारसंघातील प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी मला बळ द्या. मतदार संघातील दिन दुबळयांचे आश्रू पुसण्यासाठी मला, सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मी या निवडणूकीला सामोरे जात असल्याचे लंके यांनी सांगितले.

हनुमान भक्तालाच गदा मिळणार!
हनुमान जयंतीचे औचित्य साधून चाहत्यांनी दोन गदा भेट दिल्याच्या पार्श्‍वभुमीवर बोलताना लंके म्हणाले, मी हनुमान भक्त आहे, हनुमान भक्तालाच गदा मिळणार. मला गदा मिळणार नाही मग कोणाला मिळणार ? ही सर्वसामान्य जनतेची गदा आहेे. हनुमानरायांची गदा पैलवानाला दिली जाते अशी पुष्टीही लंके यांनी यावेळी बोलताना दिली.

कार्यकर्त्यांची हजेरी
लंके यांनी आपण अंध, अपंग बांधव तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार असल्याचे जाहिर केले होते. तरीही जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महाविकास आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. लंके हे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यानंतर कार्यकर्ते लंके यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत होते.


नगरमध्ये शिवसेनेची बंडखोरी?
खासदार सुजय विखे, आमदार निलेश लंके यांच्याबरोबरच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान आपण आपण निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत असे जाधव यांनी सांगितले आहे. महायुतीच्या उमेदवारांविरोधात ही लढाई असून त्यांना चितपट करण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज भरला असे ते म्हणाले आहेत. गिरीश जाधव यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते व पदाधिकारी यांना सोबत नेत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्या अर्जामुळे शिवसेनेत बंडखोरी तर झाली नाही ना? चर्चांना पेव फुटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेच्या पडताळणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) शपथविधीनंतर...

शनिवारी शटडाऊन, नगर शहरात पाणीपुरवठा बंद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी शहर पाणी योजनेवर शनिवारी शटडाउन घेण्यात...

कोणी लाईट देता का लाईट?; महावितरणचे रोहित्र असून अडचण नसून खोळंबा

पिंपरी जलसेन | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील पिंपरी जलसेन येथील शेतकर्‍यांना शेतीपंप व घरगुती वीज...

राणी लंकेंना ओव्हर कॉन्फिडन्स नडला; कोण काय म्हणाले पहा…

लंके यांच्या टीकेवर अर्चना दाते यांचे उत्तर | ४० वर्षांची कारकीर्द पहा मग समजेल पारनेर...