आ सत्यजित तांबे । मांडव्यात ३५ लाख रुपयांची जयहिंद अभ्यासिका
पारनेर । नगर सहयाद्री
गुरुकुल ते आजची शिक्षण पद्धती यात फार मोठे क्रांतिकारी बदल झाले असून आजच्या स्पर्धायुग पिढीला काळानुसार शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे यापुढील काळात बदलत्या शिक्षणपद्धतीनुसार गावागावात ज्ञानमंदिरे उभे करणे गरजेचे असल्याचे मत आ. सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्दमध्ये नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ. सत्यजित तांबे यांच्या निधीतून ३५ लाख रुपये खर्च करून जयहिंद युथ क्लबच्या वतीने अद्यावत व आदर्श स्पर्धा परीक्षा अभ्यासिका उभी राहत आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता या अभ्यासिकची पाहणी आमदार तांबे यांनी केली असून यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांच्यांशी संवाद साधला.
यावेळी साकूर गटातील सामजिक कार्यकर्ते सचिन खेमनर, कैलास गागरे, ग्रामपंचायत सदस्य गौतमशेठ बागुल,सागर पवार ,सुधीर भाऊ जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी रावसाहेब गागरे, प्रशांत गागरे, मंगेश गागरे ,राहुल क्षीरसागर,प्राथमिक शाळा मुख्याध्यापक बाबाजी ढोकळे शिक्षिका प्रितम बर्वे, लता शिरसाट, मंगल झावरे उपस्थित होते.
माजी सरपंच सोमनाथ आहेर यांच्या पाठपुराव्याला यश
माजी सरपंच सोमनाथ आहेर यांनी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि आमदार सत्यजित तांबे यांच्याकडे विद्यार्थ्यांना इयत्ता पहिल्यापासूनच स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळावे यासाठी अभ्यासिका सुरु करण्यासाठी पाठपुरावा व आग्रही मागणी केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना यश येत संबंधित निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी सरपंच सोमनाथ आहेर यांनी माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत आदर्श अशी शाळा उभी केली आहे. त्यामुळे एक आदर्श गावाबरोबर आदर्श शाळा या मांडवे खुर्द ची उभी राहिली असून आ सत्यजित तांबे यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
१० लाख रुपयांची प्रयोगशाळा..
पारनेर तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात असलेल्या मांडवे खुर्द येथील गावांमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत प्राथमिक शाळा असून मुख्यमंत्री स्वच्छ शाळा व सुंदर शाळा अंतर्गत तालुका पातळीवर दुसरा क्रमांक मिळालेला आहे. त्यामुळे या शाळेस दहा लाख रुपयाचे अद्यावत प्रयोगशाळा साहित्य व प्रयोगशाळा मिळावी अशी मागणी सरपंच कमल गागरे यांनी केली आहे त्यानुसार हा निधी देण्याच्या आश्वासन आ सत्यजित तांबे यांनी ग्रामस्थांना दिले आहे.