spot_img
राजकारणशिवसेनेचा झाला आता 'या' तारखेला राष्ट्रवादीचा निकाल नार्वेकर देणार !

शिवसेनेचा झाला आता ‘या’ तारखेला राष्ट्रवादीचा निकाल नार्वेकर देणार !

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल काल लागला. आता सर्वांच्या नजरा राष्ट्रवादी निकालाकडे लागल्या आहेत. आता ही देखील तारीख जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कोणाची? निवडणूक चिन्ह कोणाचे ते आमदार अपात्रतेवर निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निकाल देण्याची शक्यता आहे. ३१ जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्ष निकाल देतील असे म्हटले जात आहे.

विधानसभा अध्यक्षांनी सेंट्रल हॉलमधून शिवसेनेबाबतचा लाईव्ह निकाल जाहीर केला. ठाकरे गटाला हा निकाल मान्य नसल्याने ते सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. या घडामोडींनंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांची धाकधुक वाढली आहे.

निवडणूक आयोगाकडील सुनावणी पूर्ण झाली असून हा निकाल कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता आहे. ८ डिसेंबरला ही सुनावणी पूर्ण झाली आहे. याला आता महिना होऊन गेला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळणार की शरद पवार गटाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे.

नार्वेकरांनी राष्ट्रवादीच्या याचिकांवर सुनावणी घेण्याचे वेळापत्रक ठरविले आहे. यानुसार १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होईल. २० जानेवारीला साक्षीदारांची उलट तपासणी, 20 व 21 जानेवारी अजित पवार गट उलट तपासणी, 22 व 23 जानेवारी शरद पवार गट उलट तपासणी, 3 जानेवारी – शरद पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी व 25 आणि 27 जानेवारी – राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तीवाद केले जाणार आहेत. यानंतर राहुल नार्वेकर शिवसेनेप्रमाणेच निकाल लिहिण्यासाठी वेळ वाढवून घेण्याची शक्यता आहे. ३१ जानेवारीला जरी निकाल नाही आला तरी तो १० फेबुवारीपर्यंत येण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अक्षय कर्डिलेंना जिल्हा बँकेत तोच न्याय मिळणार का?

अहिल्यानगर / नगर सह्याद्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर जिल्ह्याच्या राजकारणासह जिल्हा बँकेत...

..आता दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे, अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्याविरोधात आता एल्गार पुकारला आहे. विरोधकांनी रस्त्यावर उतरून...

संतापजनक! रुग्णवाहिकेत आशा वर्करसोबत भयंकर घडलं, रात्री परतताना चालकाने केलं असं काही..

Maharashtra Crime News : महिलांचा लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना अजूनही थांबत नाहीत. अशात सहकाऱ्याकडूनच...

हवामान खात्याची महत्वाची अपडेट, काय दिला इशारा?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून...