spot_img
अहमदनगरहोमपीचवरच नागवडेंना धक्का? 'यांनी' धरली शरद पवार गटाची वाट..

होमपीचवरच नागवडेंना धक्का? ‘यांनी’ धरली शरद पवार गटाची वाट..

spot_img

श्रीगोंदा। नगर सहयाद्री-
श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी नुकतीच खा. शरद पवार यांची भेट घेतल्याने त्यांच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याची व जिल्ह्याची जबाबदारी दिलेल्या अनुराधा व राजेंद्र नागवडे यांना होमपीचवरच मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शुक्रवारी (दि.५) रोजी सायंकाळी जेष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी खा. शरद पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर उपस्थित होते. या भेटीमुळे भोस पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, शरद पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके हे भोस यांचे नातेवाईक आहेत. लोकसभा निवडणुकीत लंके यांना मदत करण्याची भोसांची भूमिका असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोस यांचा शरद पवार गटात प्रवेश होण्याची अटकळ बांधली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राष्ट्रवादीचे धक्का तंत्र; निवडणुकीचा सूर बदलला!, बारामती पॅटर्नची झलक दिसणार?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा नगरपरिषदेच्या निवडणुकीला आता रंग चढला आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत...

‘जलसंपदा विभागाला बेस्ट स्टेट कॅटेगरी प्रथम पुरस्कार’

राहाता । नगर सहयाद्री:- केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्याच्या जलसंपदा विभागाला बेस्ट स्टेट कॅटेगरी २०२४...

लाडक्या बहिणींना दिलासा! पती व वडील हयात नसलेल्या महिलांनाही KYC करता येणार, वाचा प्रोसेस..

मुंबई | नगर सहयाद्री:- लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रियेबाबत राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा दिलासा...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना शुभ ‘गुरुवार’

मुंबई । नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा...