spot_img
अहमदनगरमाध्यमे 'एकतर्फी' झाली की काय? 'त्या' जाहिरातबाजीचा लोकांना कंटाळा! आमदार थोरात यांनी...

माध्यमे ‘एकतर्फी’ झाली की काय? ‘त्या’ जाहिरातबाजीचा लोकांना कंटाळा! आमदार थोरात यांनी स्पष्टच मांडले मत

spot_img

संगमनेर। नगर सहयाद्री
देशात वाढलेली महागाई व बेरोजगारी, याचबरोबर महिलांचे, शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. मात्र यावर सरकार बोलत नसून धार्मिकतेचे मुद्दे पुढे केले जात आहेत. राज्यातील आणि केंद्रातील सरकार गोंधळलेले आहे. सर्व क्षेत्रात अपयशी ठरत आहे. मात्र मीडिया शांत बसून आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मीडिया बोलायला तयार नाही. त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. माध्यमे एकतर्फी झाली की काय? अशी शंका देशाला निर्माण होत असून भाजपाच्या फसव्या जाहिरातबाजीला लोक कंटाळले असल्याचे मत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मांडले.

अमृता लॉन्स येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नियोजनाची बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार लहू कानडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मा. आमदार डॉ सुधीर तांबे, शिवसेनेचे रावसाहेब खेवरे, कॉम्रेड डॉ. अजित नवले, हेमंत ओगले, डॉ एकनाथ गोंदकर, श्रीकांत मापारी, करण ससाने, शिवाजी नेहे, सुनीता भांगरे ,मधुकर तळपाडे ,शिवसेनेचे जगदीश चौधरी, संजय फड, आप्पासाहेब केसकर, सुधीर म्हस्के, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, बाबा ओहोळ, इंद्रजीत थोरात, रणजीत सिंह देशमुख आदींसह शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले, देशात इंडिया आघाडीला आणि राज्यात महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. सर्वत्र वाढलेली बेरोजगारी व महागाई हे महत्त्वाचे मुद्दे आहे. मात्र यावर सरकार बोलत नाही. धार्मिकतेचे मुद्दे पुढे केले जात आहे. फसव्या जाहिरातींमधून दिशाभूल होत आहे. आता जनता याचा लोकांना कंटाळा आला आहे.महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार असून अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत चांगले वातावरण आहे. आपसातील मतभेद दूर करून सर्वांनी एक महिन्याभर अत्यंत चांगले नियोजन करा.

सध्याच्या सरकार विरोधात कमीत कमी प्रत्येकाला 100 मुद्दे सापडतील. राज्यातील आणि केंद्रातील सरकार गोंधळलेले आहे. सर्व क्षेत्रात अपयशी ठरत आहे. मात्र मीडिया शांत बसून आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मीडिया बोलायला तयार नाही. त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. माध्यमे एकतर्फी झाली की काय अशी शंका देशाला निर्माण होत आहे. राज्यघटनेचा आणि सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाचा महाविकास आघाडीचा विचार घराघरात पोहोचवा यश आपलेच आहे असेही ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....