spot_img
अहमदनगरमहिला सक्षमीकरणावर सुजय विखे पाटील यांचा भर; महिलांना मिळाला 'या' योजनांचा लाभ

महिला सक्षमीकरणावर सुजय विखे पाटील यांचा भर; महिलांना मिळाला ‘या’ योजनांचा लाभ

spot_img

अश्विनी थोरात यांचे प्रतिपादन

अहमदनगर / नगर सह्याद्री –
जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमिकरणावर सुजय विखे पाटील यांनी विशेषभर दिला. कारण महिला सक्षम झाल्याशिवाय कुटुंबांचा विकास होणे शक्य नाही अशी धारणा दादांची आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक महिलांचा सन्मान करण्यासाठी अनेक महिला गटांची निर्मीती केली. बटत गटांच्या मार्फत महिलांना रोजगार दिला आणि स्वावलंबी बनविले. २०० हुन अधिक महिला बचत गटांना स्टॉल वाटप केले. अनेक महिलांना पीठ गिरणी, वजन काटा, पॅकींग मशीनच्या सहाय्याने त्यांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून आपल्या पायावर उभे केले असे प्रतिपादन भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात यांनी केले.

अश्विनी थोरात यांनी माहिती दिली की, सुजय विखे पाटील यांनी महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून १६. ८१ कोटी रुपये खर्च करून १०० खाटांचे अत्याधुनिक सुविधा असलेले सुसज्ज रुग्णालय उभे केले. अधिकमास महिन्यात भक्तीत लीन असलेल्या उपवास तापास करून देवाची आराधना करणाऱ्या महिलांना तिर्थस्थळी जाण्यासाठी देव दर्शन यात्रेचे आयोजन करून धार्मिक कार्याला हातभार लावला. यामुळे महिलांच्या मनात नेता कसा असावा? याचा आदर्श सुजय दादांनी निर्माण केला आहे. हजारो बहिणींचा हक्काचा भाऊ म्हणुन आज दादांना ओळखले जात आहे.

त्याच बरोबर महिलांसाठी असणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांना त्यांनी प्रभावीपणे राबवत महिल्याच्या कल्याणासाठी काम केले. जिल्ह्याचे झपाट्याने शहरीकरण होत असताना ग्रामिण भागातील महिलांना आजही चुलीवर स्वयंपाक करावा लागत होता. यामुळे त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याचे दादांच्या लक्षात आल्याने त्यांनी प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील ३ लाख १० हजार १४५ महिलांना या योजनेचा लाभ देत त्यांचे आरोग्य आणि जीवनमान उंचावले.

तसेच गरोदर मातांना सकस आहार आणि आर्थिक लाभ मिळावा आणि च्यांचे मातृत्व सुखकर आणि आनंददायी व्हावे यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या १ लाख ५३ हजार ९१९ मातांना ६२ कोटी २३ लाखाचा निधी मिळवून दिला. सुजय दादांच्या कार्यामुळे महिलांच्या मनात स्थान निर्माण झाले. याचा फायदा त्यांना यंदाच्या निवडणुकीत होणार आहे. महिलांच्या मतदानाचा मोठा टक्का सुजय विखे यांच्या पारड्यात पडला जाणार असल्याची खात्री अश्विनी थोरात यांनी व्यक्त केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....