spot_img
अहमदनगरAhmednagar: परस्पर उमेदवारी जाहीर!! स्वयंघोषीत नेत्यांना कोण थांबवणार? मंत्री विखे पाटील यांचा...

Ahmednagar: परस्पर उमेदवारी जाहीर!! स्वयंघोषीत नेत्यांना कोण थांबवणार? मंत्री विखे पाटील यांचा आमदार लंके यांना टोला

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री

लोकसभा निवडणुकीसाठी परस्पर स्वतःची उमेदवारी जाहीर करणार्‍या स्वयंघोषीत नेत्यांना कोण थांबवणार?, असा सूचक टोला पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सोमवारी पारनेरचे आमदार नीलेश लंके व त्यांच्या पत्नी राणी लंके यांची नावे न घेता लगावला. संजय राऊत यांनी कितीजणांचे प्रपंच देशोधडीला लावले, त्याची यादी मी लवकरच जाहीर करणार आहे, असेही मंत्री विखे यांनी आवर्जून सांगितले.

जिल्हा नियोजन मंडळाच्या पुढील वर्षीच्या आर्थिक आराखड्याचा आढावा घेण्यासाठी मंत्री विखे नगरला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उबाठा सेनेचे नेते संजय राऊत व सुप्रिया सुळे यांच्यावर थेट टीका केली. आ. लंके यांच्याबाबतही नाव न घेता भाष्य केले.

आ. लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी नगर लोकसभा मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे. पाथर्डीत तिची सुरुवात करताना नगर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणारच, असे स्पष्ट केले होते. यावर मंत्री विखे यांना विचारले असता, ते म्हणाले, स्वयंघोषित उमेदवारांना कोण थांबवणार? मात्र, महायुतीचा धर्म पाळून पक्षश्रेष्ठींकडून घेतलेले निर्णय सर्वांना मान्य करावे लागतील.

खा. संजय राऊत यांच्या डोयावर परिणाम झाला असून, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे, असे सांगून मंत्री विखे म्हणाले, संजय राऊत यांनी अनेकांचे प्रपंच देशोधडीला लावले आहेत. त्याची यादी मी लवकरच जाहीर करणार आहे. माधव गडकरी आज असते तर त्यांच्याबाबत काय झाले ते त्यांनी सांगितले असते.

शासन आपल्या दारी कार्यक्रमातील खर्चाबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली असली तर आधी लवासाची श्वेतपत्रिका काढावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, शनैश्वर देवस्थानची चौकशी सुरू असून, दोषींवर कारवाई होईल, तसेच महानंदा दूध प्रकल्प गुजरातला हलवण्याची चर्चा बिनबुडाची आहे. तेथे ठाकरे सेनेचीच कामगार संघटना आहे. त्यामुळे यासंदर्भात होत असलेल्या आरोपांमध्ये अर्थ नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

२२० कोटींची वाढीव मागणी
जिल्हा वार्षिक नियोजन मंडळाचा २०२४-२५ चा प्रारुप आराखडा ६३० कोटींचा असून, तो आणखी २२० कोटींनी वाढवून देण्याची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी मनपाच्या माध्यमातून जागा मिळण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांद्वारे प्रयत्न केले जातील. सीना नदीतील गाळ काढून तिचे सुशोभीकरण करण्यासाठी २० कोटींची मागणी केली आहे. नगरमधील ओढ्या-नाल्यांतील अतिक्रमणांबाबत स्वतंत्र आढावा बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री विखे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दिल्लीचं वऱ्हाड महाराष्ट्रात येणार? राहुल गांधी अडकणार विवाहबंधनात? खा. प्रणिती शिंदे..; चर्चांना उधाण

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि महायुती व महाविकास...

सातपुते कुटुंबीयांवर हल्ला करणाऱ्या लँड माफिया गुंडांवर कडक कारवाई करा

शहर भाजपाची पोलीस अधिक्षकांकडे मागणी अहमदनगर / नगर सह्याद्री - सोमवारी सायंकाळी केडगाव येथे भाजपाचे मंडल...

मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार! ‘त्याला’ निवडणुकीत धडा शिकवणार, १७ सप्टेंबर पासून..

जालना | नगर सह्याद्री:- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे....

केडगाव बायपास रस्त्यावरील खुनी हल्ला करणारे काही तासातच गजाआड; कोतवाली पोलीसांची कारवाई

अहमदनगर । नगर सहयाद्री:- उधार दिलेले पैसे परत मागितल्याचा रागातून चार जणांच्या टोळक्याने अमानुष मारहाण...