spot_img
अहमदनगरAhmednagar Breaking :..अशी 'ही' मोलकरीण!! भावाच्या मदतीने मालकांच्या घरावर दरोडा

Ahmednagar Breaking :..अशी ‘ही’ मोलकरीण!! भावाच्या मदतीने मालकांच्या घरावर दरोडा

spot_img

श्रीरामपूर। नगर सहयाद्री

काही दिवसापूर्वीच शहरातील प्रतिष्ठित डॉक्ट्ररांच्या घरावर दरोडा पडल्याची घटना वाऱ्यासारखी पसरली होती. दरोड्याचा उलगडा करण्यात श्रीरामपूर पोलिसांना यश आले आहे. घर कामाला असलेल्या मोलकरणीने आपल्या भावाच्या मदतीने दरोडा घातल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी जाबीर रशिद शेख, हिना राजू सय्यद या बहिण भावास मुद्देमालासह अटक केली आहे.

३० ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री डॉ. प्रफुल्ल बाळकृष्ण ब्रम्हे यांच्या राहत्या घराच्या गच्चीवरील लोखंडी खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करून ४० लाख रुपये रोख व ७ लाख रुपये किंमतीचा तनिष्क कंपनीचा सोन्याचा हार असा एकूण ४७ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी गेला होता. याप्रकरणी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हाच्या तपासादरम्यान पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा घर कामाला असलेल्या मोलकरणीने आपल्या भावांच्या मदतीने केला आहे. त्यानुसार भावा-बहिणीच्या विषयी गुन्हा घडल्यापासून ते आत्तापर्यतची माहिती तपास पथकाने मिळविली.

सापळा रचत आरोपी जाबीर रशिद शेखला पोलिसांनी (रेट्टी, ता. कन्नड, जि. छ. संभाजीनगर) येथे जावून  शिताफिने ताब्यात घेतले. तसेच त्याने इतर दोन साथीदारा सोबत गुन्हा केला असल्याची कबुली दिली. आरोपीकडून १९,०३००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचेकडील तपास पथकातील पो.स.ई. समाधान सोळंके, पो. हे. कॉ. शफिक शेख, मच्छिंद्र शेलार, पो.ना. रघुवीर कारखेले, पो. कॉ. राहुल नरवडे, पो.कॉ. गौतम लगड, संभाजी खरात, धंनजय वाघमारे, अंबादास अधाळे, आकाश वाघमारे, अजित पटारे, ज्ञानेश्वर वाघमोडे, गणेश गावडे (सोनई पो.स्टे), रमिझराजा अत्तार (राहुरी पो. स्टे), म.पो.ना. सोनाली गंलाडे, मिरा सरग, पुनम बागुल, अर्चना बर्ड, अरुणा पवार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यलयाचे पोना संतोष दरेकर यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार पाचपुते यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा होणार : विक्रमसिंह पाचपुते

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचा ७० वा वाढदिवस...

तरुणांसाठी खुशखबर! शिंदे सरकारची मोठी घोषणा; ५०,००० जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

मुंबई । नगर सहयाद्री:- महाराष्ट्र शासनाने बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी भरती योजना जाहीर केली आहे....

“वाहनांची तोडफोड तर काही नागरीकांना इजा” आता ‘हा’ त्रास तातडीने थांबवा अन्यथा…; विवेक कोल्हे यांनी दिला इशारा, नेमकं प्रकरण काय?

कोपरगाव । नगर सहयाद्री:- शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे. ऐन गणेश उत्सवाच्या काळात खरेदीसाठी...

सप्टेंबर महिन्यात पाऊस कोसळणार का? हवामान विभागाने दिली मोठी माहिती..

Rain update: या वर्षी राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांतील नदी-नाले आणि...