spot_img
अहमदनगरमनपा आक्रमक: 'इतके' नळ कनेक्शन तोडले, आयुक्तांनी दिले 'मोठे' आदेश

मनपा आक्रमक: ‘इतके’ नळ कनेक्शन तोडले, आयुक्तांनी दिले ‘मोठे’ आदेश

spot_img

अहमदनगर। नगर सह्याद्री
मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने आक्रमक कारवाई सुरू केली आहे. गेल्या १४ दिवसात मनपा प्रशासनाने २०५ थकबाकीदारांवर कारवाई केली आहे. आत्तापर्यंत १७८ मालमत्ताधारकांचे नळ कनेशन तोडण्यात आले आहे. मंगळवारी एकाच दिवसात ५२ नळ कनेशन तोडून तीन मालमत्ता जप्त केल्या आहेत.

महापालिकेची चालू वर्षात फक्त ४७ कोटींची कर वसुली झाली आहे. वसुलीचे प्रमाण १९ टक्के आहे. २०३ कोटींची थकबाकी अद्यापही बाकी आहे. इतिहासात प्रथमच १०० टक्के शास्ती माफीची योजना राबवूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत वाढ होऊन सुविधांवर परिणाम झाला आहे.

आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी याची गंभीर दखल घेत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. प्रभाग अधिकारी व कर निरीक्षकांची बैठक घेऊन वसुली न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे कारवाईला गती मिळाली आहे. तसेच, आठ अभियंत्यांची चार विशेष पथके वसुली व कारवाईसाठी नियुक्त करण्यात आली आहेत.

गेल्या १४ दिवसात चारही प्रभाग अधिकार्‍यांकडून ३८५० थकबाकीदारांना नोटीसा व १६७ जप्ती वॉरंट बजावण्यात आले आहेत. यात सावेडी व बुरुडगाव प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कारवाई सुरू असतानाही वसुलीत मात्र अपेक्षित वाढ झालेली नाही. दिवसभरात अवघी १३ ते १४ लाखांची वसुली होत आहे. त्यामुळे महापालिकेची आर्थिक अडचण अद्यापही कायमच आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गाडेंचे बंड शमलं अन् शिवसैनिकांची शेवटची आशा देखील!

सारिपाट / शिवाजी शिर्के- विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून नगर शहरातील उमेदवारीसाठीचा सर्वात प्रबळ असणारा पक्ष...

नगर-पारनेरमध्ये परिवर्तनाची लाट उसळणार; नेमकं कोण काय म्हणाल पहा…

संदेश कार्ले | गावात आलेल्या उमेदवारांना मतदारांनी जाब विचारावा पारनेर | नगर सह्याद्री-  पक्ष पाहुन...

“तुमच्या चार पिढ्या आल्या तरी…”; अमित शाहांचे शरद पवारांना थेट आव्हान

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली...

लाडकी बहीण योजना बंद करण्याचा कट; पंतप्रधान नेमकं काय म्हणाले पहा…

धुळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल धुळे / नगर सह्याद्री : लाडकी बहीण योजनेची देशभरात चर्चा...