spot_img
अहमदनगरAhmednagar: खासदार विखे यांच्या साखरेमुळे श्रीराम प्रतिष्ठापणेचा गोडवा वाढला

Ahmednagar: खासदार विखे यांच्या साखरेमुळे श्रीराम प्रतिष्ठापणेचा गोडवा वाढला

spot_img

सुपा जिल्हा परिषद गटात साखर वाटप

सुपा | नगर सह्याद्री
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात विश्वनाथ कोरडे, भाजपचे तालुकाध्यक्ष राहूल पाटील शिंदे, युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस सागर मैड, दत्ता नाना पवार यांच्या वतीने साखर, दाळ वाटप होत आसल्याने श्रीराम मंदिर उत्सवाचा गोडवा वाढला आहे.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हाभर साखर व दाळ वाटप केले जात आहे, दिपावलीच्या काळत विखे परिवाराकडून अहमदनगर उत्तर विभागात साखर वाटप करण्यात आली. त्यानंतर नवीन वर्षात खासदार डॉ. विखे पाटील यांनी आपला मतदारसंघ असलेल्या अहमदनगर दक्षिण भागात साखर वाटप सुरु केले आहे. एका रेशन कार्ड मागे चार किलो साखर व एक किलो चना डाळ विनामुल्य दिली जात आहे. २२ जानेवारी ला आयोधेत प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठापना समारंभ संपन्न होत आहे.

हा कार्यक्रम भाजपा पक्ष संघटन व केंद्र सरकारच्या वतीने भव्य दिव्य करण्याचे नियोजन आहे, यासाठी गल्ली पासुन दिल्ली पर्यंत तर दिल्ली पासुन आयोधे पर्यंत जोरदार तयारी चालू आहे. शेकडो वर्षाच्या प्रतिक्षे नंतर प्रभु श्रीराम अयोध्येत विराजमान होत आहेत. हा सोहळा जगातील सर्वात भव्य दिव्य सोहळा व्हावा यासाठी देशभर दिपावली साजरी करण्याचे आवाहन करत आहेत. खासदार विखे यांनी ही त्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यात नागरिकांना आनंद उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने प्रत्येक रेशन कार्ड मागे चार किलो साखर व एक किलो दाळ देण्याचे नियोजन केले आहे.

पारनेर तालुका भाजपा अध्यक्ष राहुल शिंदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर तालुक्यातील सुपा जिल्हा परिषद गटात शहाजापूर, सुपा, वाळवणे, रूईछत्रपती, भोयरे गांगर्डा, बाबुर्डी, कडूस, पिंपरी गवळी, रांजणगाव मशीद, रायतळे, अस्तगाव, आपधूप, वाघुंडे, हंगा, पळवे, जातेगाव घाणेगाव, गटेवाडी, म्हसणे सुलतानपूर, मुंगसी आदी ठिकाणी गावोगावी जाऊन साखर वाटपाचे नियोजन केले आहे. खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या साखरे मुळे पारनेरकरांचा श्रीराम प्राणप्रतिष्ठापना उत्सवाचा गोडवा अधिक वाढणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...