spot_img
अहमदनगरAhmednagar: वेताळबाबा स्टेडियमवर बुधवार पासुन ‘खासदार चषक २०२४’ क्रिकेट स्पर्धा

Ahmednagar: वेताळबाबा स्टेडियमवर बुधवार पासुन ‘खासदार चषक २०२४’ क्रिकेट स्पर्धा

spot_img

निघोज | नगर सह्याद्री
निघोज येथे वेताळबाबा स्टेडियमवर बुधवार दि.१० पासून खासदार चषक क्रिकेट स्पर्धा मोठ्या थाटामाटात संपन्न होत असून या स्पर्धा ५ दिवस चालणार असल्याची माहिती संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील यांनी दिली आहे.

गेली अनेक वर्षांपासून संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन संचलित संदीप पाटील प्रिमियर लिग माध्यमातून या क्रिकेट स्पर्धा होत असतात मात्र कोरोना काळामुळे या स्पर्धा घेण्यासाठी खंड पडला होता. २०२४ या वर्षांपासून या स्पर्धा पुन्हा नव्या जोमाने सुरू होत असून जिल्ह्यातील पहिलीच खासदार चषक क्रिकेट स्पर्धा म्हणून याकडे पाहिले जाते.

पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक एक लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७१ हजार रुपये तृतीय क्रमांक ५१ हजार रुपये, चतुर्थ क्रमांक ३१ हजार रुपये तसेच प्रथम येणार्‍या संघास मोटरसायकल तसेच मॅन ऑफ दी सिरीज या खेळाडूस मोटरसायकल अशाप्रकारे लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असून या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थ यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हात, पाय, मुंडके तोडलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडले

माउली गव्हाणे खून झालेल्या व्यक्तीचे नाव | सागर गव्हाणे आरोपी श्रीगोंदा | नगर सह्याद्री -  श्रीगोंदा...

शिवजयंती धूमधडाक्यात साजरी  

अहिल्यानगर | नगर सह्याद्री हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती सोमवारी नगर शहरात...

कर्मवीर अण्णा, ‘रयत’चे काही शिक्षक का झालेत सैराट?; नगरच्या ‘या’ शाळेत तब्बल सात शिक्षक निघाले सैराट…

पवार साहेब, आवरा तुमच्या जनरल बॉडी सदस्यांसह पदाधिकार्‍यांना / पठार भागातील पालकांनी मुली शाळेत...

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांची मोठी घोषणा; म्हणाले “योजना बंद करणार नाही, पण…”

मुंबई / नगर सह्याद्री : लाडकी बहिण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गत दर...