spot_img
अहमदनगरपोळ्याच्या दिवशी गावावर शोककळा? शेतकरी कुटुंबातील तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं..

पोळ्याच्या दिवशी गावावर शोककळा? शेतकरी कुटुंबातील तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
राहाता तालुक्यातील शिंगवे येथील मिलिंद जनार्दन जाधव (वय 42) या तरुणाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडल्याने ऐन पोळा सणाचे दिवशी शिंगवे गावावर शोककळा पसरली. मिलिंद जाधव हे शेतकरी कुटुंबातील असून नेहमीप्रमाणे पोळा सण असल्याने सकाळपासून गायी धुणं व रंगरंगोटी करण्याचे कामात व्यस्त होते.

त्यांनी मारुती व म्हसोबा मंदिरात जाऊन देवांना नारळ फोडले व पूजा अर्चा करून घरी गेले. घराचे पाठीमागे गेले असता पावसाची संततधार सुरू असल्याने पोलवरील विजेच्या तारेचा प्रवाहास त्यांचा संपर्क आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घरातील कुटुंबियांनी एकच आरडाओरडा केला.

त्यांना ताबडतोब शिर्डी येथील साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यास मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! रस्त्यावर कचरा टाकणे आता पडणार महागात

मनपा दंडात्मक कारवाई करेल ः आमदार संग्राम जगताप | पाईपलाईन रोड परिसरामध्ये राबवले स्वच्छता...

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण, नगरमध्ये घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मागील जेवणाचे बिल मागितल्याचा रागातून एका ग्राहकाने हॉटेल चालकावर लोखंडी रॉडने...

अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; कसे आहे नियोजन, वाचा सविस्तर

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना...

२२ कोटींच्या फायद्याचे आमिष दाखवून प्राध्यापकाला ३ कोटी ३ लाखांचा गंडा

तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री भाग बाजारामध्ये भरघोस परताव्याचे आमिष...