spot_img
मनोरंजनबॉलिवूडवर शोककळा ! ज्युनिअर मेहमूद यांचे निधन

बॉलिवूडवर शोककळा ! ज्युनिअर मेहमूद यांचे निधन

spot_img

नगर सहयाद्री / मुंबई : बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार ज्युनिअर मेहमूद यांचे वयाच्या 67 वर्षी निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती. ते कॅन्सरने ग्रस्त होते. त्यांचे नाव नईम सय्यद होते. कॉमेडियन मेहमूद यांनी त्यांना हे नाव दिले होते.

जॉनी लिव्हर यांनी काही दिवसापूर्वी ज्युनिअर मेहमूदसोबतचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या बिघडलेल्या प्रकृतीची माहिती देत त्यांच्यासाठी दुवा मागण्याचे आवाहन केले होते.

1967 मध्ये संजीव कुमार यांचा नौनिहाल या चित्रपटातून त्यांनी करियरला सुरुवात केली. संघर्ष, ब्रह्मचारी, दो रास्ते, कटी पतंग, हाथी मेरे साथी, हंगामा, छोटी बहू, दादागिरीसह अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले.

जितेंद्र व सचिन पिळगावकर यांनी घेतली होती भेट
जुनिअर मेहमूद यांना नोव्हेंबरमध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांचे जुने मित्र जितेंद्र, सचिन पिळगावकर यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची चौकशी केली होती.

यावेळी जितेंद्र चांगलेच भावूक झाले होते. काही दिवसांपूर्वीच ज्युनिअर मेहमूद यांनी जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. दोन्ही कलाकारांना त्यांच्या या इच्छेबद्दल कळताच त्यांनी मेहमूद यांची भेट घेतली होती.

सचिन पिळगावकर व ज्युनिअर मेहमूद जोडी
बालकलाकार म्हणून ज्युनिअर मेहमूद यांनी अनेक चित्रपटांत काम केले. यावेळी सचिन पिळगावकर यांची आणि त्यांची जोडी फार लोकप्रिय झाली होती. त्यांनी ‘बचपन’, ‘गीत गाता चल’ आणि ‘ब्रह्मचारी’ यासारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

परभणीत राहुल गांधींचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले पहा

परभणी / नगर सह्याद्री - सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येवरून राज्यातील राजकारण तापलंय. सूर्यवंशी यांच्या...

पुणतांब्यात धार्मिक स्थळी तोडफोड; ग्रामस्थ आक्रमक

राहता । नगर सहयाद्री:- राहता तालुक्यातील पुणतांबा गावात अज्ञात समाजकंटकांनी एका धार्मिकस्थळी तोडफोड केल्याची घटना...

Weather Update: हवामान बिघडलं! हिवाळ्यात पावसाळा; हवामान विभागाकडून अलर्ट

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. थंडीचा कडाका वाढत असतानाच राज्यात पाऊस बरसणार असल्याची...

IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ; प्रकरणात नवा ट्विस्ट? वाचा सविस्तर

IAS Pooja Khedkar News: बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवून आयएएस पद गमावलेल्या IAS अधिकारी...