spot_img
अहमदनगरअहमदनगर ब्रेकिंग : 'या' गावात 400 ते 500 लोकांच्या जमावाने केली तोडफोड,...

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ गावात 400 ते 500 लोकांच्या जमावाने केली तोडफोड, जाळपोळ

spot_img

नगर सह्याद्री / राहाता
अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे. 400 ते 500 लोकांच्या जमावाने दोन कुटुंबाना टार्गेट करत तोडफोड, जाळपोळ केली आहे. 71 जणांविरोधात अ‍ॅट्रोसीटीसह मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ गावात बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

अधिक माहिती अशी : सोमवार दि. 4 डिसेंबर रोजी राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगर-मनमाड रस्त्याच्या कडेला असलेल्या अस्तगाव शिवारातील एका हॉटेलमध्ये पिंपरी निर्मळ गावातील तरुणांच्या दोन गटात वाद झाले होते. याबाबत राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर गाव पातळीवर या दोन गटांमध्ये पोलिसांच्या सहकार्याने वादावर पडदा टाकण्यात आला. परंतू बुधवार दि. 6 डिसेंबर रोजी रात्री या मागील भांडणाच्या कारणावरून गावातील संतप्त झालेल्या एका गटाच्या 400 ते 500 जणांच्या जमावाने दोन घरांना लक्ष करीत घरांची तोडफोड, जाळपोळ करून घरासमोर लावलेल्या वाहनांचे नुकसान केले.

या घटनेची माहिती लोणी पोलिसांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्ला झालेल्या कुटुंबियांच्या लोकांना संरक्षण दिले. याप्रकरणी शारदा सुधाकर कोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात सुनील घोरपडे, सचिन घोरपडे, राजेंद्र घोरपडे,

नारायण घोरपडे, सोमनाथ घोरपडे, वनिता घोरपडे, शिवनाथ घोरपडे, शुभम घोरपडे, रोहन निर्मळ, संजय कदम, नंदू निर्मळ, संदीप घोरपडे, कैलास घोरपडे, नितीन घोरपडे, दिपक निर्मळ आदींसह 71 जणांविरोधात अ‍ॅट्रोसीटीसह मारहाण व नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ३१ जानेवारीपर्यंत ‘हे’ काम करा; अन्यथा लाभ मिळणार नाही?

PM Kisan Yojana: केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी असलेली महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी...

अजबच! अहिल्यानगर जिल्ह्यात कुत्र्यावर गुन्हा दाखल?; नेमकं काय घडलं..

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चक्क कुत्र्यावर गुन्हा दाखल करण्यात...

‘नाजूक’ संबंधामुळे संसाराला ‘तडा’! प्रियकराच्या मदतीने पतीला संपवल..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मिरजगाव (ता. कर्जत) येथे 10 जानेवारी रोजी एका 35-40 वर्षे...

धक्कादायक! प्रियकराच्या घराबाहेर तृतीयपंथीयाची आत्महत्या

पुणे । नगर सहयाद्री:- पुण्यातील तृतीयपंथीयाला जयपूरचा तरूण आवडला. दोघांमधले प्रेम बहरले. ते दोघेही...