spot_img
राजकारण"सिंचन घोटाळा फेम अजित पवार"... फडणवीसांचे 'ते' पत्र व्हायरल होताच राऊत म्हणाले...

“सिंचन घोटाळा फेम अजित पवार”… फडणवीसांचे ‘ते’ पत्र व्हायरल होताच राऊत म्हणाले…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री :
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. परंतु पहिल्याच दिवशी
देशद्रोहाच्या आरोपावरून शिक्षा भोगत असलेले आणि सध्या जामिनावर बाहेर असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावरून राजकीय वातावरण तापले.

याचे कारण असे की नवाब मलिक हे अधिवेशनात उपस्थित राहिले व ते सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे अजितदादांच्या गटातील आमदारांसोबत बसले होते. त्यामुळे विरोधकांनी गोंधळ घालत ज्यांच्यावर राष्ट्रदोहाचा आरोप केला त्यांच्यासोबत सत्ताधारी बसले असा आरोप झाला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. फडणवीसांच्या या पत्रानंतर शिवसेनेकडून हल्लाबोल केलाय.

फडणवीसांच्या पत्रावर आता पुन्हा एकदा शिवसेनेनं त्यांना इतर नेत्यांच्या घोटाळ्यांची आठवण करुन दिली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन फडणवीसांच्या पत्रावर अरे बापरे.. अशी प्रतिक्रिया दिली. तसेच, पिते दुध डोळे मिटुनी, जात मांजराची.. असेही म्हटले आहे.

अरे बापरे!
सत्तेपेक्षा देश महत्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्रजी यांनी दिली. महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेला हे माहीतच नव्हते.. त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल, सिंचन घोटाळा फेम अजित पवार, ED फेम भावना गवळी, सरनाईक, मुलुंडचे नागडे पोपटलाल यांना मानाचे स्थान आहे. यांचा देश हा असा आहे!

हल्ला फक्त मलिक यांच्यावर. बाकीचे यांच्या मांडीवर, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पिते दूध डोळे मिटूनी.. जात मांजराची.., अशी टीका त्यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हनी ट्रॅपचा धक्कादायक प्रकार! ‘जीवनसाथी डॉट कॉम’ बनावट आयडी, पुढे घडलं असं काही..

मुंबई । नगर सहयाद्री:- हनी ट्रॅपचा वापर करत ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या वेबसाइटवरून महिलांना...

महायुती सरकारचा धडाकेबाज निर्णय; गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणं हटवणार

मुंबई। नगर सहयाद्री:- महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेतले आहे. साच एक...

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! २१०० रुपये कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे....

आयुक्त साहेब, चमकोगिरी नको फिल्डवर काम दाखवा; कोतकर काय म्हणाले पहा…

मनोज कोतकर | मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट | आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर शहरात भटया...