spot_img
ब्रेकिंग'महिला सबलीकरणासाठी पंतप्रधान मोदींच्या टीम मध्ये खासदार विखेंना पाठवा'

‘महिला सबलीकरणासाठी पंतप्रधान मोदींच्या टीम मध्ये खासदार विखेंना पाठवा’

spot_img

अहमदनगर । नगर सह्याद्रीदेशात महिला सबलीकरणासाठी मोदीपर्वाची गरज असून त्यासाठी नगर मधून डॉ. सुजय विखे यांना विजयी करण्याचा निर्धार करा असे आवाहन भाजपच्या महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा प्रियाताई जानवे यांनी केले.

मोदी सरकारच्या पर्वात महिलांच्या विकासासाठी सर्वाधिक योजना आणल्या. याच योजना जिल्ह्यात तळागळापर्यंत पोहचविण्याचे काम मागील पाच वर्षात खासदार सुजय विखे यांनी केले. यामुळे देशात मोदींजी आणि जिल्ह्यात डॉ. सुजय विखे पाटील हेच योग्य नेतृत्व करू शकतील असेही त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

प्रियाताई जानवे यांनी यावेळी विरोधी उमेदवाराचा चांगला समाचार घेतला. त्यांनी सांगितले की, आमदार असताना विरोधी उमेदवाराने महिलांना कशा प्रकारे त्रास दिला हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. मोठ्या पदावर असतानाही त्या महिलांचे खच्चीकरण करून त्यांना आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न केला. जर अशी व्यक्ती सत्तेत आली तर महिलांना रस्त्यावरून फिरणे अशक्य होईल. यामुळे अशा वृत्तींना मतदारांनी हाणून पाडले पाहिजे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

तर दुसरीकडे डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना पीठ गिरणी, शेती अवजारे, पॅकिंग मशीन आदी वस्तूंच्या माध्यामातून स्वयंरोजगार देऊन त्यांच्या पायावर उभे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. प्रधानमंत्री मातृयोजनेच्या मार्फत दीड लाखाहून अधिक महिलांचे मातृत्व सुरक्षित आणि सुखद केले.

तर उज्वला योजनेच्या माध्यमातून तीन लाखाहुन अधिक महिलांचे आरोग्य सुरक्षित केले. अशा विविध योजनाच्या माध्यमातून डॉ. सुजय विखे हे सच्चा भाऊ म्हणून महिलांच्या मागे उभे राहिले असल्यामुळे येत्या १३ मे रोजी डॉ. सुजय विखे मोठ्या मदाधिक्याने मतदान करा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीम मध्ये पाठवा असे आवाहन त्यांनी केले.

मोदी यांच्या टीम मध्ये पाठवा असे आवाहन त्यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar News : शाळेच्या पहिल्याच दिवशी मोठा अनर्थ टळला; अहमदनगरमध्ये कुठे घडला गंभीर प्रकार…

स्लॅबचे प्लॅस्टर कोसळले | ठेकेदारावर तातडीने कारवाईची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री Ahmednagar News...

दुर्दैवी : विजेच्या शॉक लागून शेतकर्‍याचा मृत्यू, कुठे घडली घटना पहा

बेलवंडीतील घटना | ग्रामस्थांनी केला महाविरणाचा निषेध श्रीगोंदा | नगर सह्याद्री बेलवंडी शिवारात पडलेल्या विजेच्या...

पवारांनी मोदींच्या सभांचा स्ट्राईक रेटच काढला ; म्हणाले..

मुंबई: नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात 18 सभा आणि एक रोड...

Nagar Arban Bank News : नगर अर्बन बँक घोटाळ्यात मोठी अपडेट; ‘त्या’ अधिकाऱ्याच्या खात्यात मोठे घबाड

अहमदनगर | नगर सह्याद्री Nagar Arban Bank News : येथील नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या...