spot_img
ब्रेकिंग३५ वर्ष घरात खासदारकी..? नगरचा अर्धवट रस्ता अन कोल्हारचा लटकलेला पूल; आमदार...

३५ वर्ष घरात खासदारकी..? नगरचा अर्धवट रस्ता अन कोल्हारचा लटकलेला पूल; आमदार थोरात यांनी साधला विरोधकांवर निशाणा

spot_img

संगमनेर। नगर सहयाद्री

निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी जनतेला मिळावे हे स्वप्न ठेवून आपण काम केले. प्रत्येक दिवशी कामात योगदान दिले. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाच्या वेळी योगदान देणारे, प्रकल्पग्रस्त किंवा साधा कामगार ही उपस्थित नव्हता ही चांगली बाब नसून ३५ वर्ष आपल्या घरात खासदारकी असतांना काय केले हा मोठा प्रश्न आहे. असे म्हणत आमदार थोरातांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

मोठ्या प्रयत्नातून मिळालेल्या निळवंडेच्या पाण्यामुळे तालुक्यात आनंदाची दिवाळी होत आहे. पुढील काळात हे पाणी सर्वांना मिळेल यासाठीच काम केले जाणार असून निळवंडेचे पाणी हा परमेश्वराचा प्रसाद असल्याचे प्रतिपादन धरण व कालव्यांचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

वडगाव पान येथे पंचक्रोशीच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळा व जलपूजन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर मा. आ. डॉ. सुधीर तांबे, साखर संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, सौ दुर्गाताई तांबे ,शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी,आदींसह पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी ग्रामस्थांच्या वतीने प्रत्येक गावात आलेल्या निळवंडेच्या पाण्याचा कलश करून त्याचे पूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संघर्षातून समृद्धी निर्माण करणारा संगमनेर तालुका आहे. 1999 पासून या कामाला आपण सुरुवात केली दररोज कामाचा आढावा घेतला. आदर्शवत पुनर्वसन केले. धरणग्रस्तांना संगमनेर तालुक्यात जमिनी दिल्या. सहकारी संस्थांमध्ये सन्मानाच्या नोकऱ्या दिल्या.

उन्हाळ्यामध्ये निळवंडे धरणात दहा टीएमसी पाणी होते खरे तर त्यावेळी दुष्काळी गावांमधील सर्व बंधारे भरून घेता आले असते. मात्र श्रेयासाठी पाणी सोडणे थांबवले. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ज्यांनी योगदान दिले ते तिथे नव्हते. आणि ज्यांचे काही योगदान नाही ते श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जनतेला सर्व ज्ञात आहे.

आता डाव्या कालव्यातून पाणी सुरू झाले आहे. मात्र फोनाफोनी करून पाणी फोडले जात आहे. अनेक गावांना वंचित ठेवले जात आहे. अशी दडपशाही व दहशतीचे राजकारण संगमनेर तालुक्यात खपवून घेतले जाणार नाही. 35 वर्ष आपल्या घरातही या विभागाची खासदारकी होती. संगमनेर साठी काय केले हा मोठा प्रश्न आहे.

नगर- मनमाड रस्ता का होत नाही, कोल्हार चा पूल तसाच लटकलेला आहे. खरे विकास कामे करण्याची तिकडे गरज आहे. आम्ही काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. चांगल्या वाईट दिवसातही एकनिष्ठ आहोत. काही लोक संधी साधूपणे पद्धतीने उड्या मारतात. हे जनतेला मान्य नाही. ईडीच्या भीतीने तिकडे गेले कि ते मोकळे राहतात. असेही ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पैसा झाला खोटा, घोटाळा झाला मोठा जादा परताव्याचे आमिष ; अहिल्यानगरकरांचे करोडो रुपये लुटले

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जादा परताव्याचे आमिष, महिनाभरात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवत जादा...

‌‘एपीएमसी‌’ मार्केट नवी मुंबईतून हद्दपार?, वाचा कारण..

नवी मुंबई | नगर सह्याद्री मुंबईतील वाढती लोकवस्ती, वाहतुकीचे प्रश्न आणि जागेची अनुपलब्धता या कारणांसाठी...

भयंकर अपघात: रेल्वेची क्रॉसिंग पॉईटवर शाळेच्या बसला जोरदार धडक, अनेक चिमुकले..

Railway Crossing Accident: तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील सेम्मानगुप्पम भागात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला....

बावडी शिवारात धक्कादायक प्रकार; चार आरोपींना तात्काळ अटक!, नेमकं काय घडलं?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील बावडी शिवारात गायी व गोऱ्यांची वाहतूक करणाऱ्या मजुरावर चार...