पंढरपूर। नगर सहयाद्री
मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. नवव्या दिवशी देखील त्यांना राज्यभरातून पाठींबा दिला जात आहे.
मराठा आदोलक आक्रमक झाल्याचे चित्र समोर येत आहे. सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनाही आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.
यावेळी आदोलकांनी घोषणाबाजी केली. गावात पुढाऱ्यांना गाव बंदी असतांना शहाजी पाटलांची कार पाहताच आदोलक आक्रमक झाले. दरम्यान आदोलक व चालक यांमध्ये वादावादी झाली.
आंदोलक आक्रमक होताच समजदारीची भुमिका घेत आमदार पाटील यांनी खाली उतरून आंदोलकांची माफी मागितली. त्यानंतर आमदार सांगोल्याकडे रवाना झाले.