spot_img
ब्रेकिंगअहमदनगर: शहरात 'हा' व्यवसाय...; पुरवठा विभागाची 'सावेडी' त धाड!

अहमदनगर: शहरात ‘हा’ व्यवसाय…; पुरवठा विभागाची ‘सावेडी’ त धाड!

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री

शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या व्यवसायावर जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने धाड मारली आहे. अन्नधान्य वितरण विभागाच्या पुरवठा निरीक्षक निशा मोरेश्वर पाईकराव (रा. चांदणी चौक, नगर) यांच्या फिर्यादीवरून पसार आरोपी सनी दत्ता शिंदे (रा. वैदुवाडी, सावेडी) व विशाल विजय कांबळे (रा. नालेगाव ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात अवैधरित्या व्यवसाया सुरु असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने मंगळवारी दि ३१ रोजी दुपारच्या सुमारास सावेडी उपनगरातील सोनानगर चौक, बारस्कर मळा या ठिकाणी सुरु असलेल्या अवैधरित्या गॅस रिफिलिंग व्यवसायांवर धाड टाकली. त्यावेळी गॅस भरणारा इसम त्या ठिकाणाहून पळून गेला. सनी दत्ता शिंदे (रा. वैदुवाडी, सावेडी) असे त्याचे नाव आहे.

दुसरी कारवाई दुपारी दोनच्या सुमारास नालेगाव अमरधाम शेजारी असलेल्या शासकीय जागेत विशाल विजय कांबळे गॅस रिफिलिंग सेंटर चालविताना आढळुन आला. दोन्ही ठिकाणाहून गॅस रिफिलिंग मशीन, वजन काटा, गॅसच्या भरलेल्या व रिकाम्या टाक्या असा एक लाख आठरा हजार दोनशे रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar Crime: होमगार्ड पथकाच्या ट्रॅव्हल बसवर दगडफेक

अहमदनगर | नगर सह्याद्री सध्या देशात लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना एक धक्कादायक बातमी समोर...

Ahmednagar News: अनधिकृत होर्डिंग्जबाबत महापालिकेने उचलले कठोर पाऊल

८३ होर्डिंग्ज अनधिकृत | ४४ होर्डिंग्जचा परवाना संपला अहमदनगर | नगर सह्याद्री शहर व उपनगर परिसरात...

Ahmednagar News:…म्हणुन ग्रामसेवक गिरींचे निलंबन? नेमकं प्रकरण काय

अहमदनगर | नगर सह्याद्री कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत नगर तालुयातील सांडवे येथील ग्रामसेवक नितीन...

Ahmednagar Crime: चेन स्नॅचिंग करणार्‍या टोळीच्या मुस्क्या आवळल्या,’असा’ लावला सापळा

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी | चौदा गुन्ह्यांची उकल अहमदनगर | नगर सह्याद्री जिल्ह्यात चेन स्नॅचिंग...