spot_img
अहमदनगरअहमदनगर : मराठा आरक्षणासाठी 'या' माजी खासदाराच्या नातवाचा राजीनामा

अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी ‘या’ माजी खासदाराच्या नातवाचा राजीनामा

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्जुने खारे (ता. नगर) ग्रामपंचायतचे उपसरपंच अंकुश रावसाहेब शेळके यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. शेळके यांनी

राजीनाम्याचे पत्र सरपंच यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. अंकुश शेळके हे माजी खासदार दादापाटील शेळके यांचे नातू आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देऊन शेळके यांनी आरक्षणाची मागणी करत आपल्या पदाचा राजीनामा दिला.

शेळके म्हणाले की, मराठा आरक्षणाचा संघर्ष मागील चार दशकांपेक्षा अधिक काळापासून सुरू आहे. मराठा समाजाची बिकट अवस्था असून, समाज हा न्याय, हक्काचे आरक्षण मागत आहे.

आजही समाज लोकशाही मार्गाने आंदोलन करत असून, समाजाच्या संतप्त भावना व्यक्त होत आहे. सरकारने मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नये. आरक्षणासाठी हा लढा सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गाडेंचे बंड शमलं अन् शिवसैनिकांची शेवटची आशा देखील!

सारिपाट / शिवाजी शिर्के- विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून नगर शहरातील उमेदवारीसाठीचा सर्वात प्रबळ असणारा पक्ष...

नगर-पारनेरमध्ये परिवर्तनाची लाट उसळणार; नेमकं कोण काय म्हणाल पहा…

संदेश कार्ले | गावात आलेल्या उमेदवारांना मतदारांनी जाब विचारावा पारनेर | नगर सह्याद्री-  पक्ष पाहुन...

“तुमच्या चार पिढ्या आल्या तरी…”; अमित शाहांचे शरद पवारांना थेट आव्हान

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली...

लाडकी बहीण योजना बंद करण्याचा कट; पंतप्रधान नेमकं काय म्हणाले पहा…

धुळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल धुळे / नगर सह्याद्री : लाडकी बहीण योजनेची देशभरात चर्चा...