शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ व गुणे आयुर्वेद महाविद्यालय यांच्यावतीने आरती
अहिल्यानगर / नगर सह्याद्री
आमदार संग्राम जगताप यांचेकडे विकासाचे व्हिजन असल्याने त्यांचे मंत्रिपद निश्चित असल्याचे मत ज्ञानेश्वर रासकर यांनी व्यक्त केले.
शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ व वे गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल यांच्या वतीने आरती करण्यात आली. यावेळी संचालक ज्ञानेश्वर रासकर, सचिव डॉ विजय भंडारी, वैशाली ससे, प्राचार्य लोंढे, उपप्राचार्य सुरज ठाकूर ,आर एम ओ समीर होळकर, प्रतिभा भारदे, आदींसह डॉक्टर, अध्यापक, विद्यार्थीं आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संचालक ज्ञानेश्वर रासकर म्हणाले कि सलग तीन वर्ष आमदार संग्राम जगताप हे निवडून आले आहेत त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे मंत्रिपद हे निश्चित आहे .आमदार जगताप यांचेकडे विकासाचे व्हिजन असल्यामुळेच जनतेने त्यांना भरभरून मतांनी विजयी केले आहे . आमदार जगताप यांच्या रूपाने मंत्रिपद मिळाले तर संपूर्ण जिल्यात विकासाची गंगा सुरु राहील असे रासकर यांनी सांगितले यामुळेच आज आम्ही ;श्री विशाल गणेश मंदिर येथे आरती केली. तसेच यावेळी सचिव डॉ विजय भंडारी यांनी आपले मनोगत व्यक्त करून आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.