spot_img
अहमदनगरआमदार संग्राम जगताप यांनी दिली मनपा कर्मचाऱ्यांना खुशखबर ; कर्मचाऱ्यांनी साजरा केला...

आमदार संग्राम जगताप यांनी दिली मनपा कर्मचाऱ्यांना खुशखबर ; कर्मचाऱ्यांनी साजरा केला जल्लोष अन म्हणाले…

spot_img

दिवाळीपूर्वीच महापालिका कर्मचार्‍यांची दिवाळी / सातवा वेतन आयोगाच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची सही | आमदार संग्राम जगताप यांचा पाठपुरावा यशस्वी / आमदारांच्या हस्ते सोडले उपोषण

अहमदनगर / नगर सह्याद्री –
गेल्या नऊ दिवसांपासून सातवा वेतन आयोगाच्या प्रमुख मागणीसाठी महापालिका कर्मचार्‍यांनी उपोषण सुरु केले आहे. मनपा कर्मचार्‍यांच्या प्रश्नाची आमदार संग्राम जगताप यांनी गांभीर्याने दखल घेत कर्मचार्‍यांच्या सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंुंंबईत ठाण मांडले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांना भेटून सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला आहे. मंगळवारी उशिरा प्रस्तावावर मुख्यमंत्री शिंदे यांची स्वाक्षरी झाली असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. तसेच आमदार जगताप यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले.

गेल्या आठ वर्षापासून महापालिका कर्मचार्‍यांनी सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी लढा उभारला आहे. त्यासाठी अनेक वेळा शासनाला पत्र व्यवहार केला. निवेदने दिली. पाठपुरावाही केला. दरम्यानच्या काळात महापालिका कर्मचार्‍यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये कर्मचार्‍यांनी लाँग मार्चही काढला होता. परंतु, त्यानंतर सरकार दरबारी बैठका होऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने महापालिका कर्मचारी बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशीनकर यांनी उपोषण सुरु केले आहे. उपोषणाला महापालिका स्वच्छता कर्मचार्‍यांनी कामकाज बंद ठेवून पाठिंबा दिला होता. दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चालला आहे. तर दुसरीकडे उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. लाईट, पाणी, स्वच्छता, साफसफाई बंद ठेवण्याचा इशारा कर्मचार्‍यांनी दिला होता.

दरम्यान, महापालिका कर्मचार्‍यांच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी मुंबईत ठाण मांडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महापालिका कर्मचार्‍यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. मंगळवारी उशिरा मनपा कर्मचार्‍यांच्या सातवा वेतन आयोगाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी झाली असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. तसेच उपोषणकर्त्यांची भेट घेत सविस्तर माहिती दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आमदार जगताप यांच्या हस्ते उपोषण सोडले. दरम्यान, महापालिका कर्मचार्‍यांच्या सातवा वेतन आयोगाचा प्रश्न आ. जगताप यांनी मार्गी लावल्याने महापालिका कर्मचार्‍यांनी आ. जगताप यांचे आभार मानले.

*आ. जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे चार हजार कर्मचार्‍यांना होणार फायदा
राज्यातील इतर महापालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. परंतु, अहमदनगर महापालिकेचे उत्पन्न कमी असल्याचे कारण सांगत कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू केला जात नव्हता. याच प्रश्नासाठी महापालिका कर्मचार्‍यांनी आठ वर्षापासून लढा सुरु केला होता. कर्मचारी संघटनेच्यावतीने सरकार दरबारी अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला. आंदोलन करण्यात आली. आतही ९ दिवसांपासून उपोषण सुरु करण्यात आले होते. अखेर आमदार संग्राम जगतान यांनी महापालिका कर्मचार्‍यांच्या प्रश्नामध्ये गांभीर्याने लक्ष घातल्याने सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागला आहे. आ. जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे १६०० कायमस्वरुपी व २५०० सेवानिवृत्त अशा एकून चार हजार कर्मचार्‍यांचा फायदा होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्हा बँकच असुरक्षीत असेल तर सारंच अवघड!

नोकरभरती मुद्यावर विखेंच्या जोडीने थोरातांचीही चुप्पी बरीच बोलकी | कर्डिलेसाहेब, तडा गेल्यास जोडणं अवघडं...

कोतकरांच्या अर्जावर शंकर राऊत यांचा आक्षेप; पत्रकार परिषदेत दिली मोठी माहिती..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- अशोक लांडे खून प्रकरणात शिक्षा लागलेले संदीप, सचिन, अमोल कोतकर यांच्या...

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी अहमदनगर बंद!

अहमदनगर | नगर सह्याद्री मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अहमदनगर येथील मराठा आंदोलकांनी आज...

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहिण’ योजनेचा तिसरा हप्त्याची तारीख ठरली; कधी होणार जमा? वाचा..

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे...