spot_img
ब्रेकिंगआमदार लंके यांचे ग्रामस्थांना गिफ्ट! ग्रामपंचायतची सत्ता परिवर्तन होताच..

आमदार लंके यांचे ग्रामस्थांना गिफ्ट! ग्रामपंचायतची सत्ता परिवर्तन होताच..

spot_img

पारनेर | नगर सहयाद्री 

गेल्या अनेक वर्षापासून वाडेगव्हाण ते मावळेवाडी या रस्त्याची दुर्दशा झाल्याने ग्रामपंचायत मध्ये सत्ता परिवर्तन होताच आमदार नीलेश लंके यांनी या रस्त्यासाठी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून मावळेवाडी ग्रामस्थांना दिवाळीनिमित्त गिफ्ट दिली असल्याची माहिती युवा नेते कांतीलाल भोसले यांनी दिली आहे.

मावळेवाडीची सत्ता माझ्या ताब्यात द्या मी तुम्हाला कोणत्याही निधीची कमतरता पडून देणार नाही असे आश्वासन आमदार लंके यांनी मावळेवाडी ग्रामस्थांना केले होते. त्यानुसार मावळेवाडी येथील युवा नेते कांतीलाल भोसले यांनी ३५ वर्षाची सत्ता उलथून टाकत मावळेवाडी ग्रामपंचायतीवर आमदार निलेश लंके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला आहे.

मावळेवाडी गावात प्रथमच ३५ वर्षाच्या प्रस्थापित्यांच्या विरोधात सत्ता परिवर्तन झाले असून लोकनियुक्त सरपंच म्हणून कल्याणी कांतीलाल भोसले यांना मावळेवाडी ग्रामस्थानी कौल दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी कांतीलाल भोसले व नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सदस्यांचा सत्कार करत पहिल्या दिवशी ७५ लाख रुपयांचा मावळेवाडी-वाडेगव्हाण रस्तास प्राथमिक मंजुरी दिली. यापुढे मावळेवाडी मावळेवाडी गावचा विकास माझ्यावर सोडा असा असे आश्वासन आमदार लंके यांनी दिले आहे.

गावचा विकास हेच आमचे लक्ष कल्याणी भोसले

मावळेवाडी गावच्या ग्रामस्थांनी ३५ वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी हे गाव विकासापासून वंचित ठेवले त्यामुळे मोठ्या आशेने व अपेक्षांनी मला लोकनियुक्त सरपंच म्हणून गावाने संधी दिली असून आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून गावचा विकास हेच आमचे लक्ष असून गावचा कायापालट करण्याचे स्वप्न आहे.

-कल्याणी कांतीलाल भोसले ( लोकनियुक्त सरपंच, मावळेवाडी)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अभिनेत्री कंगनाची पोस्ट चर्चेत, महिलांना पुरुषांची गरज पण…

मुंबई। नगर सहयाद्री अभिनेत्री कंगना रनौत कायम चर्चेत असते. आता देखील तिने एक पोस्ट शेअर...

काका अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांवर मोठा राजकीय वार ! घणाघाती टीका

कर्जत / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये...

सोने खरेदी करताना बिलाचे महत्व काय? खरे बिल कसे असावे? जाणून घ्या

नगर सह्याद्री टीम : सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. गुंतवणुकीसाठी अनेक लोक सोने खरेदी...

शेतकऱ्यांना मालामाल करेल ‘ही’ वनस्पती, शेकडो महिलांनी कमवलेत लाखो रुपये

नगर सह्याद्री टीम : Lemongrass Farming : प्रत्येकाला कमी खर्चात चांगला नफा मिळवायचा असतो आणि...