spot_img
महाराष्ट्रमनोज जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर 'हा' गंभीर आरोप, आता 'या' तारखेपासून पुन्हा महाराष्ट्र...

मनोज जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर ‘हा’ गंभीर आरोप, आता ‘या’ तारखेपासून पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढणार

spot_img

छत्रपती संभाजीनगर | नगर सह्याद्री :
महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी १५ ते २३ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र दौरा करणार असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली.

तसेच १ डिसेंबरला मराठा समाजासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात साखळी उपोषण करावे, असे आवाहन करून ओबीसी नेत्यांनी ४० वर्षे आमचे आरक्षण खाल्ले हे सामान्य ओबीसींना पटल्यानेच तो समाज आमच्या बाजुने असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

महाराष्ट्र दौर्‍याचे वेळापत्रकच जरांगे पाटील यांनी जाहीर केले. त्यानुसार १५ नोव्हेंबरला वाशी, परंडा, करमळा, १६ नोव्हेंबरला दौंड, १७ तारखेला सांगली, इस्लामपूर, कर्‍हाड, १८ नोव्हेंबरला सातारा, वाई, रायगड, १९ नोव्हेंबरला रायगड दर्शन, महाड, मुळशी, आळंदी, २० नोव्हेंबरला तुळापूर, खराडी, पुणे, चंदननगर, खालापूर, कल्याण, २१ नोव्हेंबरला ठाणे, नाशिक, त्र्यंबकेश्वर, २२ नोव्हेंबरला विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर, २३ नोव्हेंबरला नेवासा, बोदेगाव त्यानंतर अंतरवली असा हा दौरा असणार आहे. सहा टप्प्यात हा दौरा होणार आहे.

जरांगे म्हणाले, राजकारणी, उद्योगपती, डॉटर या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही सगळा दौरा आमच्या खर्चाने करणार आहोत. आमच्या नावाने कुणी पैसे मागितले असतील आणि ज्यांनी दिले असतील तर ते परत घ्या. आम्ही सामान्य माणसांचा लढा उभा केला आहे. पैसे कमवण्यासाठीचे हे साधन नाही.

सामान्य मराठ्यांनाही कुणी एक रुपया देऊ नये आणि कुणाकडून घेऊ नये. यात पैशांचा काही संबंध नाही. माझ्या नावाने पैसे मागितले म्हणून पैसे दिले असतील तर ते आत्ताच परत मागा. आमच्या आंदोलनाला कुठलाही डाग लागता कामा नये.

मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात झाली आहे. २४ डिसेंबरला आपल्याला आरक्षण मिळणार आहे. मी आज आवाहन करतो की कुणीही आत्महत्या करु नये. मराठा आरक्षणासाठीची एकी दिसली पाहिजे. काही मागेपुढे झाले तर आपल्याला सज्ज राहायचे आहे. कुणीही मतभेद होऊ देऊ नका. आपण एकजूट ढळू द्यायची नाही. आपली एकी आपण दाखवून देऊ, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

छगन भुजबळ यांच्या विचारांमध्ये परिवर्तन होत नाही तर आम्ही तरी काय करणार? आम्ही आता त्यांना समजवणार नाही. गोरगरीबांना आरक्षण मिळू द्यायचे नाही, अशीच त्यांची इच्छा आहे. ओबीसी नेत्यांनी ४० ते ५० वर्षे आपले आरक्षण खाल्ले आहे. सामान्य ओबीसींना हे पटले आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांचे आता सामान्य माणसांना पटेनासे झाले आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar: शहरासह जिल्ह्यात जोर ‘धार’

रस्त्यांवर अर्धाफुट पाणी; नगरकरांची अक्षरश: त्रेधातिरपीट अहमदनगर | नगर सह्याद्री मागील रविवारपासून अवकाळीचा तडाखा जिल्ह्याला बसत...

Ahmednagar: पत्र आले आमदारांचे, ‘माफी’ सूचली प्रशासनाला

शास्तीच्या रकमेत सवलत देण्याची परंपरा कायम ः आता प्रतिसादाकडे लक्ष अहमदनगर | नगर सह्याद्री आमदारांनी पत्र...

Parner: खासदार विखे शेतकऱ्यांच्या बांधावर! म्हणाले, शेतकऱ्यांना..

पारनेर। नगर सह्याद्री- तालुक्यातील महसूल व कृषी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे करताना कोणत्याही अडचणी येऊ...

Ahmednagar: सैनिकाला मारहाण..; नगरच्या ‘या’ भागात ‘धक्कादायक’ प्रकार

अहमदनगर | नगर सह्याद्री- सैनिकाच्या पत्नी विषयी समाजात वाईट बोलून त्यांची बदनामी केली. याबाबत जाब...