Politics News: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीत (मविआ) जागावाटपाचा फॉर्मुला ठरला असून काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने एकमताने जागा वाटपाचे स्वरूप निश्चित केले असल्याची माहिती समोर आली आहे. मविआच्या बुधवारी झालेल्या बैठकीत या फॉर्मुल्यावर सकारात्मक चर्चा झाली.
सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीने जागावाटपात बाजी मारली आहे. काँग्रेस ११० जागांवर, ठाकरेंची शिवसेना ९५ जागांवर, तर शरद पवारांची राष्ट्रवादी ८३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. या जागा आपल्या कोट्यातून मित्रपक्षांना देण्यावर सर्व पक्षांनी सहमती दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे.
दुसरीकडे, महायुतीमध्ये जागावाटपावर अद्याप एकमत झालेले नाही. आगामी निवडणुकांसाठी महायुतीच्या फॉर्मुलावर तयारी सुरु आहे. आता सर्वांच्या नजरा महायुतीच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.