spot_img
अहमदनगरयुवासेनेतील खदखद चव्हाट्यावर! सोशल मीडियावर 'ती' पोस्ट व्हायरल..

युवासेनेतील खदखद चव्हाट्यावर! सोशल मीडियावर ‘ती’ पोस्ट व्हायरल..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतांनाच नगर शहर शिवसेना व युवा सेनेतील खदखद चव्हाट्यावर आली आहे. युवा सेना प्रमुख हर्षवर्धन कोतकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत वरिष्ठांचे लक्ष वेधले आहे. युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांना विचारात घेतले जात नसून इतर गटातील फितूर कार्यकर्त्यांना सोबत घेतले जात असल्याचे कोतकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

आगामी विधानसभा निवडणूक मुदतीच होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असून निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून आमदार संग्राम जगताप यांची उमेदवारी अंतिम मानली जात आहे. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी महापौर अभिषेक कळमकर व शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची तयारी सुरु आहेत.

नगर शहरात ठाकरे गटाची मोठी ताकद असल्याने येथील जागा महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. परंतु, विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतांनाच नगर शहर युवा सेनेतील खदखद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेचे पदाधिकारी युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांना विचारात घेत नसल्याचा आरोप कोतकरांकडून केला जात आहे. तसेच स्वपक्षातील पदाधिकार्‍यांना विचारात न घेता दुसर्‍या गटातील फितूर कार्यकर्त्यांना मोठेपणा दिला जात आहे. त्यामुळे आमदारकीचे स्वप्न पाहणार्‍यांनी पक्षाचे नुकसान करु नये असा टोलाही नगर शहर युवा सेना प्रमुख कोतकर यांनी लगावला आहे. कोतकर यांनी केलेल्या सोशल मीडियावरील पोस्ट नगर शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...