अहमदनगर। नगरत सहयाद्री
लग्न करण्यास नकार देणार्या तरूणीला शिवीगाळ करून तिच्यासह आई-वडील, भावाला मारण्याची धमकी दिली. केडगाव उपनगरातील तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून संतोष कोकाटे (रा. चिंचोडी पाटील ता. नगर) याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी खासगी नोकरी करतात. बुधवारी (दि. १७) दुपारी साडेबाराच्या सुमारास ‘तू मला खुप आवडते, तू माझ्याशी लग्न कर’, असे म्हणून संतोषने फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
फिर्यादीने लग्नास नकार दिल्यानंतर संतोषला राग आला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून ‘तू जर माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी तुला व तुझ्या आई-वडिलांना, भावाला मारून टाकीन’, अशी धमकी दिली. फिर्यादीने त्याच्याकडे विश्वासाने दिलेला मोबाईल तो घेऊन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.