spot_img
महाराष्ट्रमराठा आंदोलन चिघळले ! मंत्री छगन भुजबळ यांच्या घराच्या सुरक्षेत वाढ, काय...

मराठा आंदोलन चिघळले ! मंत्री छगन भुजबळ यांच्या घराच्या सुरक्षेत वाढ, काय आहे कारण? पहा..

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री:
मनोज जरांगे पाटील हे मागील सहा दिवसापासून उपोषण करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज राज्यभर आंदोलन करत आहे. आता या आंदोलनाला हिंसक वळण लागले असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

बीडमधील माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. त्यांच्या वाहनांचेही नुकसान झाले. जाळपोळही झाली. आता अनेक नेत्यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आता त्यामुळे राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, भुजबळ यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यानंतर त्यांना मराठा समाजातूनही अनेक धमकीचे फोन त्यांना आले. मात्र, राजकीय नेत्यांच्या घरांवर होणारे हल्ले लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...

महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ – मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?

मुंबई / नगर सह्याद्री - Weather Update: देशभरात सध्या हवामान वेगाने बदलताना दिसतंय ....

निवडणुकीच्या तोंडावर उबाठा शिवसेनेत फेरबदल; जिल्हाप्रमुखपदी कुणाची निवड?

लोकसभा संघटकपदी गाडे, दक्षिण जिल्हाप्रमुखपदी दळवी, महानगर प्रमुखपदी काळे यांच्या निवडी अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना...

पारनेर नगराध्यक्षपदाच्या निवडीत दडपशाही; महायुतीचे पत्रकार परिषदेत आरोप, हंगा वरून कारभार पाहणाऱ्यांना धडा शिकवणार!

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये चांगलाच कलगीतुरा...