spot_img
अहमदनगरबऱ्याच ‘मंथरा’ फिरत आहेत सावध राहा..दोन महिन्‍यांनी उत्तरे देऊ ! खा. सुजय...

बऱ्याच ‘मंथरा’ फिरत आहेत सावध राहा..दोन महिन्‍यांनी उत्तरे देऊ ! खा. सुजय विखेंचा घणाघात

spot_img

राहाता / नगर सह्याद्री : कोणाला किती मोर्चे आणि आरोप करायचे करू द्या, या आरोपांना आपण दोन महिन्‍यांनी उत्‍तर देवू, सध्या तालुक्यात ब-याच ‘मंथरा’ फिरत आहेत, त्यांच्यापासून सावध राहा. तालुक्याचा सुसंस्कृतपणा सोडू नका, गावातील प्रत्येक कार्यकर्त्याने दहा कुटूबियांपर्यंत योजना पोहचवून विरोधकांना कामातून उत्‍तर द्या असे आवाहन खा.डॉ.सुजय विखे विखे पाटील यांनी केले.

राज्य सरकारच्या महिला व बालविकास आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटांना स्वंयरोजगाराचे साहित्य, बांधकाम कामगारांना संरक्षण किटचे आणि भांड्याच्या सेटचे वापट खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.

आपल्या भाषणात खा.विखे पाटील म्हणाले की, गेल्या पन्नास वर्षापासून विखे पाटील परीवार लोकांसाठी काम करीत आहे. गावाच्या विकास कामातून आणि सामान्य माणसाला योजनेच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका कायम घेतली. म्हणूनच या भागातील जनता ना.विखे पाटील यांना चांगल्या मताधिक्याने निवडून देत असल्याचे स्पष्ट करून जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडताना महीला बचत गटांना ४० कोटी रूपये जिल्हा नियोजन विकास समितीच्या उपलब्ध करून दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

आज महीला बचत गटांना मिळालेल्या स्‍टॉल करीता शासनाला भरावे लागणारे ४० हजार रुपये विखे परीवाराने भरले असल्याचे नमूद करून काहींचे राजकारण पैसे कमाविण्यासाठी आहे. मात्र आमचे राजकारण व्यक्तिगत खर्चातून योजना राबवविण्याचे असल्याचे खा.विखे पाटील म्हणाले.

आज तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने ३७ व्या वर्षी खासदार झालो. नगर दक्षिण मध्ये चांगले काम केले. त्या भागातील लोकांना न्याय देताना इकडेही काम करायचे आहे. त्यामुळे सध्या कोण मोर्चे काढतो, कोण काय आरोप करतो याकडे माझे लक्ष नाही. दोन महीन्यांनी आपल्याला उत्‍तर द्यायचे असल्याचा इशारा देवून खासदार डॉ.विखे पाटील म्हणाले की, आपल्याला कोणाला अपमानीत करायचे नाही. कारण आपल्‍यावर खासदार डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा संस्‍कार आणि शिकवण आहे. त्‍यांचीच संघटना आपल्‍याला पुढे घेवून जायची आहे.

आजही लोकांचे प्रश्‍न खुप प्रलंबित आहेत, त्‍यांना न्‍याय देण्‍याची भूमिका ही गावपातळीवर आता कार्यकर्त्‍यांनी घ्‍यावी असे सुचित करुन, प्रत्‍येक कार्यकर्त्‍याने शासनाची कोणतीही योजना दहा कुटूंबियांपर्यंत घेवून गेली पाहीजे, यातूनच लोकांचा विश्‍वास संपादन होईल. गेली अनेक वर्षे आपल्‍यावर निळवंडेच्‍या प्रश्‍नावरुन आरोप झाले. मात्र जिल्‍ह्याचे पालकमंत्री म्‍हणून, या धरणातून जिरायती भागाला पाणी सोडण्‍याचे भाग्‍यही विखे पाटील परिवारालाच मिळाले.

शिर्डीची एमआयडीसीही आता लवकरच उभी राहत असून, याचा नकाशाही तयार झाला आहे. पन्‍नास कंपन्‍यांची झालेली नोंदणी हेच विरोधकांना उत्‍तर आहे. या तालुक्‍यातील सामान्‍यातील सामान्‍य कुटूंबातील तरुणाला रोजगाराची होणारी निर्मिती हे विखे पाटील परिवाराचे काम आहे. तालुक्‍यात आरोप प्रत्‍यारोप करीत सध्‍या फक्‍त ‘मंथरा’ फिरत आहेत. त्‍यांच्‍याकडे लक्ष देवू नका अशी मिश्‍कील टिपणी खासदार विखे पाटील यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ.धनंजय धनवटे यांनी केले. या कार्यक्रमात महीला बचत गटांना मंजुर झालेल्‍या कर्जाचे धनादेश तसेच विविध साहित्‍यांचे वाटप करण्‍यात आले. कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे तसेच सर्व संस्‍थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राष्ट्रवादीचे राजेंद्र फाळके यांचा भाऊ- पुतण्यासह नरेंद्र फिरोदिया व प्रतिष्ठीतांवर फसवणूक, ऍट्रासीटीचा गुन्हा

आदिवासी समाजाची जमिन फसवणूक खरेदी करणे व विक्री करणे भोवले अहमदनगर | नगर सह्याद्री आदिवासी भिल्ल...

शरद पवार शुक्रवारी नगरमध्ये; लंके यांच्या संवाद यात्रेचा समारोप; ‘या’ दिवशी नीलेश लंके अर्ज दाखल करणार!

अहमदनगर | नगर सह्याद्री महाविकास आघाडीचे नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नीलेश लंके यांच्या संवाद यात्रेचा...

आमदार निलेश लंकेंसाठी फाळके-कळमकर यांची केमिस्ट्री!; थोरातांचेही बळ! लंके प्रतिष्ठानची स्वतंत्र यंत्रणा निर्णायक…

मतदारसंघात प्रतिष्ठानचे आतापासूनच स्वतंत्र अस्तित्व | संवाद यात्रा निर्णायक टप्प्यावर! सारीपाट / शिवाजी शिर्के लोकसभा निवडणुकीसाठी...

जिल्हा बँकेचा ‘त्या’ शेतकऱयांना दिलासा! घेतला मोठा निर्णय, ‘ते’ व्याज २२ एप्रिलपर्यंत जमा करणार

माजी मंत्री, चेअरमन शिवाजी कर्डीले यांची माहिती अहमदनगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा...