अहमदनगर | नगर सह्याद्री
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उभे केले आहे. परंतु हे आंदोलन चिरडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे ठाम उभा आहे असे मत व्यक्त करत त्यांच्या आंदोलनास सकल मराठा समाजाचा पाठिंबा अहमदनगरमधील मराठा समाजाने जाहीर केला.
नगर शहरातील कोहिनुर मंगल कार्यालयात शनिवारी (दि.२ मार्च) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाची बैठक पार पडली. यावेळी हे निर्णय घेण्यात आले. या बैठकीस मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकार्यांसह सकल मराठा समाज उपस्थित होता.
यावेळी आंदोलनाची दिशा, मनोज जरांगे यांना पाठिंबा, सरकारची आंदोलनाविरोधी भूमिका आदींवर चर्चा झाली. तसेच मराठा समाजामधीलच अजय बारस्कर यांसारखे काही लोक सध्या मनोज जरांगे पाटील यांवर टीका करत आहेत. अशा लोकांचाही यावेळी मराठा समाजाकडून निषेध करण्यात आला.