spot_img
महाराष्ट्रखेकडे पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा शॉक लागून मृत्यू

खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा शॉक लागून मृत्यू

spot_img

कोल्हापूर / नगर सह्याद्री : दोन सख्खे भाऊ खेकडे पकडण्यासाठी गेले असता त्यांच्यासोबत मोठी धक्कादायक घटना घडली. तेथे डुकरांच्या शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने दोघे मरण पावले.

धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर तेथील नागरिकांनी भीतीपोटी त्यांचे मृतदेह जंगलात फेकून दिले होते. ही घटना राक्षी (ता. पन्हाळा) येथे बुधवारी (दि. ८) रात्री घडली.

परंतु याचा उलगडा सोमवारी (दि. १३) सकाळी झाला. जोतिराम सदाशिव कुंभार (वय ६४) आणि नायकू सदाशिव कुंभार (वय ६०, दघे रा. राक्षी) अशी मृतांची नावे असून त्यांच्या मृतदेहाचा शोध पोलीस घेत आहेत.

अधिक माहिती अशी : जोतीराम व नायकू बुधवारी रात्री खेकडे पकडण्यासाठी धरणाचा ओढा परिसरात गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते परतले नाहीत. दुसऱ्या दिवशी मुलांनी शोधाशोध सुरू केली. ड्रोनने शोधाशोध करूनही कुंभार बंधूंचा शोध लागला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी पन्हाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तपासादरम्यान गावातील काही लोकांनी धरणाचा ओढा परिसरात डुकरांच्या शिकारीसाठी विजेच्या तारा बसवल्याची माहिती पन्हाळा पोलिसांना मिळाली.

त्यानुसार त्यांच्याकडे अधिक तपास केला असता कुंभार बंधूंचा मृत्यू तारा ला स्पर्श करून झाल्याचे समोर आले. कुंभार बंधूंचे मृतदेह सहा जणांनी जवळच्या जंगलात फेकून दिले. पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने मृतदेहांचा शोध घेतला जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....

आजचे राशी भविष्य! ‘या’ चार राशींसाठी आजचा दिवस अवघड, वाचा तुमचे आजचे राशी भविष्य

मुंबई। नगर सहयाद्री मेष राशी भविष्य अनपेक्षितपणे प्रवास करावा लागल्यामुळे दमून जाल. तेलाने मसाज करून शरीराच्या...