spot_img
महाराष्ट्रमनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झाला..नारायण राणेंची जहरी टीका,मराठा समाज संतप्त

मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झाला..नारायण राणेंची जहरी टीका,मराठा समाज संतप्त

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत सुरु केलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्‍या डोक्‍यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते आता काहीही बडबड करायला लागले आहेत. त्यांना मी मराठयांचा नेता मानत नाही, असे नारायण राणे यांनी ट्वीट करत म्हटले आहे. राणेंच्या या ट्वीटवर मराठा समाजातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामळे ते आता काहीही बडबड करायला लागले आहेत. त्यांना मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्यांनी केली. त्यांनी आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेंव्‍हा महाराष्‍ट्रात येतील त्‍यावेळी जागेवरुन हलून दाखवावे. तेव्हा असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल.

आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत, असे ट्वीट नारायण राणे यांनी केले आहे. यामुळे आता नाव वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बा…शनिदेवा घालवणार का तू त्यांचे डोळे!, कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव..

कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना...

अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा! राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले...

नगर शहरात धक्कादायक प्रकार! महिलेल दिले गुंगीचे औषध अन्…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक...

अपघाताचा थरार! कार कोसळली, काचा फोडून नालेगावातील दोघांनी अशी केली सुटका..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक...