spot_img
महाराष्ट्रमनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव.. उपोषणाचा पाचवा दिवस.. धाकधूक वाढली..महाराष्ट्रभर उद्रेकास सुरवात

मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव.. उपोषणाचा पाचवा दिवस.. धाकधूक वाढली..महाराष्ट्रभर उद्रेकास सुरवात

spot_img

जालना / नगर सह्याद्री
मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर व्हावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी १० तारखेपासून उपोषण सुरु केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती सध्या खालावली असून अन्न, पाणी, औषधही न घेतल्याने विपरीत परिणाम होऊ लागले आहेत.

दरम्यान त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिला आहे. सगेसोयरेच्या कायद्याच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत. सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाला कायद्यात बदला, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडत चालली आहे. जरांगे यांची तब्येत खालावली असून उपचाराला ते नकार देत आहेत.

महाराष्ट्रभर पडसात
मनोज जरांगे यांची तब्येत चिंताजनक होताच त्याचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरूवात झाली आहे. काल रात्री जालना – जळगाव रोडवर टायर जाळण्यात आले. आज हिंगोलीमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. लातूर, उस्मानाबाद अशा अनेक ठिकाणी आज बंद पुकारण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ एक मोठी रॅली काढण्यात येणार आहे. तर मालेगावमध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी पडसाद उमटत आहेत.

अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय पाणी घेणार नाही
मनोज जरांगे पाटील मात्र त्यांच्या उपोषणावर ठाम आहे. सगेसोयरेच्या अध्यादेशावर अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेणार नाही, असे खोल गेलेल्या आवाजात पण ठामपणे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही. मराठ्यांची लाट कशी उसळली आहे बघा. सरकारचे काय डोळे गेलेत का, अक्कल नाही का यांना अशा शब्दांत जरांगे यांनी सरकारवर टीका केली.

20 फेब्रुवारीला सरकारचं अधिवेशन घेणार?
सरकार 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावणार असून त्यात मराठा आरक्षणासंदर्भात स्वतंत्र कायदा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा; वादग्रस्त मोहोळ विरुद्ध राक्षे लढतीची चौकशी होणार

योगेश दोडके यांची माहिती / प्रा.विलास कथुरे यांची प्रमुखपदी नियुक्ती अहिल्यानगर / नगर सह्याद्री : अहिल्यानगरमध्ये...

तब्बल १९ बोगस कंपन्यांमधून कोट्यवधी लुटले; मोबाईल चालू तरी पोलिसांना सापडेना संदीप अन् त्याची टोळी…

 पोलीस अधिकार्‍यांच्या भूमिकाच संशयास्पद स्पेशल रिपोर्ट / शिवाजी शिर्के - सह्याद्री मल्टीनिधी ही कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत...

शनिशिंगणापूर देवस्थानचा मोठा निर्णय; शनिदेवाला ब्रँडेड तेलानेच करावा लागेल अभिषेक!

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एक मार्च २०२५ पासून...

‘सुपा, पारनेर, बेलवंडीत दरोडा टाकणारे जेरबंद’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- सुपा, पारनेर, बेलवंडीत परिसरात घरफोडी करणारे अट्टल दरोडेखोरांना, स्थानिक गुन्हे...