spot_img
अहमदनगरहुबेहूब दिसणारे मनोज जरांगे पाटील ! जामखेड मध्ये बेमुदत उपोषण

हुबेहूब दिसणारे मनोज जरांगे पाटील ! जामखेड मध्ये बेमुदत उपोषण

spot_img

जामखेड / नगर सह्याद्री : गेल्या सहा दिवसापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून जरांगे पाटलांसारखे हुबेहूब दिसणारे भुतवडा येथील हनुमंत मोरे हे देखील गुरुवार (दि १५ फेब्रुवारी) पासून जामखेड तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेच कायद्यात रूपांतर व्हावे या मागणीसाठी जरांगे पाटील १० फेब्रुवारी २०२४ पासून आमरण उपोषणास बसले आहेत. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पाठिंबा म्हणून आता मनोज जरांगे पाटलांसारखे दिसणारे हुबेहूब जामखेड तालुक्यातील भुतवडा गावचे तरुण हनुमंत मोरे हे देखील उपोषणाला बसले आहेत.

हनुमंत मोरे यांच्या उपोषणास जामखेड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने देखील पाठिंबा देण्यात आला आहे. मोरे व मराठा क्रांती मार्चाच्या वतीने जामखेड चे तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देण्यात आले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या सारखेच दिसत असल्याने मोरे यांना भेट देण्यासाठी व पहाण्यासाठी नागरीकांचा गर्दी होत आहे.

उपोषणकर्ते हनुमंत मोरे म्हणाले, मी जरांगे पाटील यांच्या सारखा दिसतो याचा मला अभिमान वाटतो. ते आंतरवाली सराटी येथे देखील गेले होते. तसेच जामखेड येथुन मुंबई येथे निघालेल्या मोर्चात देखील ते त्या वेळी सहभागी झाले होते. तसेच मराठा समाजाच्या आसलेल्या विविध अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी मी मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने होणार्‍या प्रत्येक आंदोलनात सहभागी होणार असल्याचे देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी प्रा.मधुकर, राळेभात शहाजी, विकास राळेभात, मंगेश आजबे, संभाजी राळेभात, महादेव डोके, जयसिंग डोके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; ‘या’ हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

Butox Injection Death: एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...

राष्ट्रवादीची ताकद वाढणार; ‘या’ ४ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार?

Politics News: सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. जिल्ह्यातील चार माजी आमदार...

अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; महिलेच्या बंगल्यावर दरोडा

अकोले | नगर सह्याद्री अकोले शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेत्या काशीबाई म्हतारबा डोंगरे (रा.देवठाण रोड...

‘मळगंगा देवीच्या घागर दर्शनासाठी लोटला जनसागर’

निघोज | नगर सह्याद्री राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता....