spot_img
ब्रेकिंगअहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न, मुख्य चौकात रंगला थरार

अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न, मुख्य चौकात रंगला थरार

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री : Ahmadnagar Breaking : पारनेर शहरात मुख्य चौकातील हॉटेल दिग्विजयसमोर गुरुवारी सकाळी १०.१५ च्या दरम्यान रांजणगाव मशीद येथील अल्पवयीन तरूणाने गावठी कट्टा व चाकू घेत नगरसेवक युवराज पठारे यांच्या छातीला गावठी कट्टा लावत गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.

कट्ट्यात ही गोळी फसल्याने फक्त आवाज झाला. पुढील गोळी झाडण्यापूर्वी तेथे उपस्थित असलेले भरत गट यांनी तो पिस्तूल हिसकावल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यात घटनेत शिवसेना नगरसेवक युवराज पठारे थोडक्यात बचावले आहेत. या घटनेला जुन्या वादाची किनार असल्याची चर्चा असून पारनेर पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत. घटनेची माहिती कळताच पैलवान युवराज पठारे समर्थकांनी पारनेर पोलीस स्टेशन परिसरात गर्दी केली.

पारनेर शहरातील बसस्थानक परिसरातील मुख्य चौकात गुरुवारी सकाळी शिवसेना नगरसेवक युवराज पठारे आपल्या तीन ते चार मित्रांसह चहा घेत होते. त्यावेळी रांजणगाव मस्जिद येथील अल्पवयीन तरुणाने हातात गावठी कट्टा व चाकू घेऊन शिवसेनेचे नगरसेवक व पारनेर तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान युवराज पठारे यांच्या छातीला गावठी कट्टा लावला. सुरुवातीला तो बहुरूपी असल्याचे त्यांना वाटल्यामुळे त्यांनी त्याची मस्करी करत मजा घेण्यास सुरुवात केली.

परंतु गावठी कट्ट्यातून अल्पवयीन तरुणाने पठारे यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. तेथे उपस्थित असलेल्या भरत गट यांनी त्याच्या हातातील गावठी कट्टा हिसकावल्याने हातातील चाकूने त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपस्थित तरुणांनी हल्लेखोरास बेदम चोप दिला. घटनेची माहिती कळताच पारनेर पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. ही घटना वैयक्तिक वादातून की अन्य काही कारणाने घडली याचा पोलीस निरीक्षक समीर बारावकर स्वतः तपास करत आहेत. त्याच्या अन्य साथीदारांना पकडण्यासाठी पारनेर पोलिसांनी शोध सुरू केला आहे. दुपारी उशिरापर्यंत घटने संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलीस निरीक्षक बारवकरांना सलामी..
पारनेर येथील भर चौकात हा थरार रंगला. गावठी कट्ट्यात गोळी अडकल्याने शिवसेना नगरसेवक युवराज पठारे बालंबाल बचावले. अल्पवयीन हल्लेखोर पारनेर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. जुन्या भांडणातून हा वाद या टोकाला पोहोचला असून महाविद्यालयीन तरुणांनी गावठी कट्टा कुठून आणला याबाबत तर्कवितर्क व चर्चेला उधाण आले आहे. नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना थेट महाविद्यालयीन तरुणाने गावठी कट्टाची सलामी दिली आहे.

अन्य दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू..
पारनेर येथे सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान हॉटेल दिग्विजय येथे अल्पवयीन हल्लोखोरासह दोन तरुण होते. गावठी कट्टा व चाकू बाहेर काढतात उपस्थित असलेल्या काही तरुणांनी सावधगिरी बाळगत हा कट्टा हिसकावून त्याला मारहाण केली. त्यामुळे त्यांच्यासोबत असणारे दोन तरुण पळून गेले, सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून अन्य दोघांचा शोध पारनेर पोलिस घेत आहेत. पकडलेला हल्लेखोर मी एकटाच असल्याचे पोलिसांना सांगत आहे.

खा. विखे, आ. लंके यांच्याकडून विचारपूस..
शिवसेनेचे नगरसेवक व पारनेर तालुका संघाचे अध्यक्ष युवराज पठारे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेने पारनेर तालुयात खळबळ उडाली आहे. भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी फोनवर चौकशी केली. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार नीलेश लंके, माजी सभापती काशिनाथ दाते, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, तालुकाध्यक्ष डॉ. श्रीकांत पठारे यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांनी भेट घेत युवराज पठारे यांची विचारपूस केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमधील तीन युवकांचा मृत्यू; तिरुपतीवरुन परत येतांना नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्हयातील शेवगाव येथील युवकांच्या अपघताचे वृत्त समोर आले...

आमदार संजय गायकवाडांचा राडा; कँटिन ऑपरेटरला लाथा-बुक्क्‌‍यांनी मारहाण, कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड...

प्रवरेला पूर; अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ गावांचा संपर्क तुटला

संगमेनर । नगर सहयाद्री:- अकोले तालुक्यातील भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर-रतनवाडी-हरिश्चंद्रगड-कुमशेत-साम्रद भागात...

पारनेरकरांना खुशखबर! सुजित झावरे पाटील यांच्या पाठपुराव्यास यश; ‘या’ कामांसाठी जलसंपदा विभागाची मंजुरी

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील कुकडी डावा कालव्यावरील पुलांच्या कामांस मंजुरी देण्याचे निर्देश जलसंपदा...