spot_img
अहमदनगर'पत्रकार निखिल वागळे यांची तोफ नगरमध्ये धडाडणार'

‘पत्रकार निखिल वागळे यांची तोफ नगरमध्ये धडाडणार’

spot_img

नगर। नगर सहयाद्री
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची तोफ अहमदनगर मध्ये धडाडणार आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी निर्भय बनोच्या जाहीर सभांचे आयोजन केले जात आहे. त्याला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांची गर्दी होत आहे. ९ फेब्रुवारीला पुण्यात झालेल्या वागळेंच्या सभेपूर्वी चार ठिकाणी वागळे, ॲड. असीम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या गाडीवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सभेला विरोध करत हल्ला केला होता. अंडी, शाई फेकली होती. त्यानंतर आता येत्या मंगळवार दि. २० फेब्रुवारीला वागळे यांची सभा नगर शहरात आयोजित करण्यात आली आहे. अहमदनगर लोकशाही बचाव मंचाने यासाठी पुढाकार घेतला आहे.

सायंकाळी ५.३० वा. माऊली सभागृह, झोपडी कॅन्टीन येथे सभा होणार आहे. लखनऊ व नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ऐतिहासिक इंडियन सायन्स काँग्रेसचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सर्जेराव निमसे सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. सभा आयोजना बाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे मंचाचे कार्यकर्ते किरण काळे, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, दीपक ससाणे, इंजि. सुजित क्षेत्रे, देवराम शिंदे, विलास उबाळे, अनिस चुडीवाला आदींनी दिली आहे. संविधान संरक्षणाचे उद्दिष्ट समोर ठेवत सक्षम नागरी चळवळ उभी करण्यासाठी मंचाची स्थापना करण्यात आली आहे. नुकतीच मंचाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे वागळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत निमंत्रण दिले. सामाजिक कार्यकर्त्या निशाताई शिवूरकर (संगमनेर) देखील सभेला संबोधित करणार आहेत.

देशात आणि राज्यात हुकुमशाही पद्धतीने सरकार काम करत आहे. निवडणूक आयोग, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय या स्वायत्त संस्थांचा राजकीय हेतूने गैरवापर सुरू आहे. बेरोजगारी, महागाई, धार्मिक, जातीय तेढ यामुळे जनता त्रस्त आहे. शेतकरी, कामगार, लघु उद्योजक, व्यापारी, सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनता सर्वच देशोधडीला लागले आहेत. त्यातच अहमदनगरसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी गुंडगिरी, खून, गोळीबार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी, झूंडशाही, लोकशाही विचार आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले अशा हिंसक घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मात्र नाहक होरपळून निघत आहे. हुकुमशाहीला विरोध आणि लोकशाही वाचविण्यासाठीचा लढा जन सहभागाने पुढे नेण्यासाठी सभा आयोजित करण्यात आल्याचे मंचाने म्हटले आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...

पोटची मुलगी गेली, भावाची मुलगी मारली; पारनेरमध्ये चुलत्याकडून पुतणीचा खून!

पारनेर । नगर सहयाद्री :- जुन्या रागातून चुलत्याकडून १६ वर्षीय मुलीचा डोयात दगड घालून...

औरंगजेबाविषयी गौरवोद्गार; निघोजमध्ये तणाव; नेमकं काय घडलं?

निघोज । नगर सहयाद्री:- पाच महिन्यापूर्वी येथील एका कुटुंबातील १६ वर्षीय युवकाने औरंगजेबाविषयी गौरवोद्गार...