spot_img
ब्रेकिंगमनोज जरांगे पाटील संतापले; बापजाद्यांनी ज्यांना मोठे केले, तेच आता...

मनोज जरांगे पाटील संतापले; बापजाद्यांनी ज्यांना मोठे केले, तेच आता…

spot_img

पुणे | नगर सह्याद्री – मराठा आरक्षणाची लढाई खूप पिढ्यांपासून सुरू आहे. अनेक वर्षांपासून मराठा समाजाने आरक्षणासाठी टोकाची झुंज दिली. मराठा समाज राज्य आणि देशासाठी लढत राहिला. मराठा माय-बापानं कधी जातीवाद केला नाही. सगळ्या जातीना आधार आणि पाठबळ देण्याचं काम केले. आपल्या बापजाद्यांनी ज्यांना मोठे केले, तेच आज आपल्यासमोर उभे राहिले आहेत, अशा शब्दात मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

खराडी (पुणे) येथील सभेत ते बोलत होते. जरांगे पाटील म्हणाले, डोळ्यासमोर कोणत्याही जातीचा माणून समोर आला तर मराठ्यांच्या नजरेत माणुसकी जीवंत होत असे. कधीच त्यांनी जात शोधली नाही. हातात आहे ते मोठ्या मनाने देण्याचे काम मराठ्यांनी केले. प्रत्येकाच्या सुखात-दुःखात मराठे धावून गेले. कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे, हे काळजीपूर्वक बघीतले. दुसर्‍याचे लेकरू उघडे पडू दिले नाही. मराठे सढळ हाताने इतरांना देत राहिले. आरक्षण देतानाही कधीही भेदभाव केला नाही. कोणाला मिळाले आणि आम्हाला का मिळाले नाही, याविषयी ब्र शब्द काढला नाही. गरिबांच्या लेकरांचे कल्याण होत असेल तर अडवे पडायचे नाही ही मराठ्यांची प्रामाणिक भावना. स्वतःच आरक्षण असतानाही दुसर्‍याला दिले. तरीही मराठे कधीही तुम्ही घेऊ नका, असे म्हणाले नाही.

आज ही आमचा हात मदत करताना मागे घेत नाही. बापजाद्यांच्या संस्कारावर पाऊलावर पाऊल ठेऊन आमची वाटचाल सुरु आहे. जरांगे म्हणाले, ७५ वर्षात सर्व नेत्यांना मोठे करण्याचे काम मराठ्यांनी केले. आज सर्व पक्षातील नेत्यांना मराठे मोठे करत आहेत. आरक्षणापायी मराठ्यांच्या घरातील लेकरु त्रास सहन करत आहे. ज्यांना मोठे केले ते मदतीला येत नाही. मराठ्यांची लेकरे नोकरीसाठी वणवण भटकत असताना कोणी मदतीला येत नाही. मराठा समाजाची लेकरे टाहो फोडत आहे, कोणीतरी आमची हाक ऐका; पण कोणी त्यांच्याकडे पहायला तयार नाही. आपल्या बापजाद्यांनी ज्यांना मोठे केले तेच आज आपल्या समोर आहेत. तेच म्हणतायेत मी तुम्हाला आरक्षण मिळू देणार नाही. मराठ्यांचे पुरावे असतानाही नाही म्हणून सांगितले जायचे. ज्या-ज्या समित्या झाल्या त्यांनी सांगितले पुरावे सापडत नाहीत. त्यावर आजपर्यंत मराठ्यांनी विश्वास ठेवला, ७५ वर्षांनी आज २०२३ मध्ये मराठा समाजाचे पुरावे सापडायला लागले आहेत.

त्यावेळी कोणते पुरावे घेतले नाहीत, नोंदी नाहीत, कागदपत्र नाहीत. तरीही त्यांना आरक्षण दिले गेले. त्यावेळी व्यवसायावर आधारित आरक्षण दिले गेले. मग मराठ्यांना आरक्षण का नाही. मंडल कमिशनने जी जात ओबीसीमध्ये घातली, त्याची पोटजात म्हणून आणखी एक जात घातली. मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? नितीन करीर यांना मराठा आरक्षणा संर्दभातील एका समितीचे अध्यक्ष केले. तीन महिन्यात त्यांना रिपोर्ट द्यायचा होता. पण करीर यांना माहीतच नव्हते ते समितीचे अध्यक्ष आहेत, असेही मनोज जरांगे म्हणाले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...