spot_img
देशऑस्टेलिया सहाव्यांदा विश्वविजेते, भारतीयांच्या डोळ्यात पाणी...

ऑस्टेलिया सहाव्यांदा विश्वविजेते, भारतीयांच्या डोळ्यात पाणी…

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था – अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या वर्ल्ड कप २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर मात केली. ऑस्ट्रेलियाने आपला सहावा एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकला. याआधी १९८७,१९९९, २००३, २००७, आणि २०१५ मध्ये विजय मिळवला होता. टीम इंडिया हरल्यानंतर संपूर्ण देश दु:खात गेला. कॅप्टन रोहित शर्मा आणि अनेक टीम मेंबर्सच्या डोळ्यात पाणी आले.

आयसीसी ने जाहीर केली वर्ल्डकपची बेस्ट प्लेइंग इलेव्हन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. सुमारे दीड महिना चाललेल्या या स्पर्धेत दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघातील तब्बल ६ खेळाडूंना या आयसीसीच्या प्लेइंग इलेव्हन आपले स्थान मिळवले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स यालाच यातून बाहेर ठेवण्यात आले आहे. आयसीसीने रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनचा कर्णधार बनवले आहे.

रोहितशिवाय उर्वरित ५ भारतीयांमध्ये विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेलॉर्ड कोएत्झी याला १२ वा खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे.

पाकिस्तान-इंग्लंडचा एकही खेळाडू नाही
भारतीयांव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-ओपनर क्विंटन डी कॉकलाही या प्लेइंग-इलेव्हन मध्ये स्थान मिळाले आहे. तर चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघातील केवळ दोन खेळाडूंना प्लेइंग-इलेव्हन मध्ये स्थान मिळाले आहे. हे फिरकीपटू अष्टपैलू ग्लेन मॅसवेल आणि फिरकीपटू अ‍ॅडम झाम्पा आहे.

याशिवाय न्यूझीलंडच्या डॅरेल मिशेलला मधल्या फळीत स्थान मिळाले आहे. गोलंदाजीत श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाची प्लेईंग-इलेव्हन मध्ये निवड झाली आहे. दुसरीकडे, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड, नेदरलँड आणि बांगलादेशच्या एकाही खेळाडूला स्थान देण्यात आले नाही.

आयसीसीने कामगिरीच्या आधारे संघ निवडला
आयसीसी ने या प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्व खेळाडूंना त्यांच्या कामगिरीच्या आधारे स्थान दिले आहे. यामुळेच २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणार्‍या टॉप-५ खेळाडूंना प्लेइंग इलेव्हन मध्ये स्थान देण्यात आले आहे. अष्टपैलू कामगिरीच्या आधारे जडेजाची निवड करण्यात आली.

विश्वचषक २०२३ चे टॉप-५ फलंदाज
विराट कोहली – ७६५ धावा
रोहित शर्मा – ५९७ धावा
क्विंटन डी कॉक – ५९४ धावा
रचिन रवींद्र – ५७८ धावा
डॅरेल मिशेल – ५५२ धावा

वर्ल्ड कप २०२३चे टॉप-५ विकेट घेणारे खेळाडू
मोहम्मद शमी – २४ विकेट
अ‍ॅडम झाम्पा – २३ विकेट्स
दिलशान मदुशंका – २१ विकेट्स
जसप्रीत बुमराह – २० विकेट्स
जेराल्ड कोएत्झी – २० विकेट्

आयसीसीची वर्ल्डकप प्लेइंग इलेव्हन
क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, डॅरेल मिशेल, केएल राहुल, ग्लेन मॅसवेल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, दिलशान मदुशंका, अ‍ॅडम झम्पा आणि मोहम्मद शमी. १२वा खेळाडू: जेराल्ड कोएत्झी (वेगवान गोलंदाज)

पंतप्रधानांनी केलं सांत्वन
टीम इंडियाच्या पराभावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट करत टीम इंडियाचं सांत्वन केलं आहे. प्रिय टीम इंडिया, विश्वचषक स्पर्धेत तुमची प्रतिभा आणि जिद्द लक्षात घेण्याजोगी होती. तुम्ही मोठ्या भावनेने खेळलात आणि देशाला मोठा अभिमान मिळवून दिला. आम्ही आज आणि सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचं देखील कौतूक केलं आहे. विश्वचषकातील शानदार विजयाबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन! स्पर्धेतील त्यांची प्रशंसनीय कामगिरी होती, ज्याचा शेवट शानदार विजयात झाला. आजच्या उल्लेखनीय खेळाबद्दल ट्रॅव्हिस हेडचे अभिनंदन, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी कांगारूंचं अभिनंदन केलंय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....