श्रीगोंदे / नगर सह्याद्री : मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी (९ फेब्रुवारी) श्रीगोंदे तालुक्यातील आवटेवाडी येथे रात्री आठ वाजता जाहीर सभा होणार आहे. त्यादृष्टीने सभेचे नियोजन करण्यात आले असून सभेची जय्यत तयारी सुरु आहे.
मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभा घेत आरक्षणाविषयी मराठा समाजामध्ये जनजागृती करत आहेत. श्रीगोंद्यातील सभेचे नियोजन अंतिम टप्प्यात असून सभेची जय्यत तयारी सुरु आहे.
पन्नास एकर जागेत सभेचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते भारती इंगवले यांनी दिली. पार्किंगची व्यवस्था चाळीस ते पन्नास एकरामध्ये तसेच, सभेसाठी ५० ते ६० एकराची स्वच्छता करण्याचे काम सुरु आहे. सभेला येणाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्यासह सर्व व्यवस्था केली जाणार आहे.