अहिल्यानगर । नगर सहयाद्री: –
नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत सहा अवैध गावठी हातभट्टीच्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुदेमाल नष्ट केला असून दोन महिलांसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (ता. १२) हि कारवाई करण्यात आली आहे. सोमनाथ नारायण पवार (रा. साकत), श्रीरंग पांडुरंग गव्हाणे (रा. वाळुंज), गणेश टिल्लू पवार (रा.नेप्ती ), कानिफनाथ भिमाजी कळमकर (रा. नेप्ती) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.
अवैध धंद्यांवर कारवाई दरम्यान, नगर तालुका परिसरात अवैध गावठी हातभट्टी तयार करण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार अवैध गावठी अड्ड्यांवर कारवाई करत १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे २५०० लिटर गावठी कच्चे रसायन, १४०० हजार रुपये किंमतीची १४० लीटर गावठी हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते सो, पोसई धुमाळ सो, सहायक फौजदार गांगर्डे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रविकिरण सोनटक्के, दाते, मंगेश खरमाळे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रांत भालसिंग संभाजी बोराडे यांच्या पथकाने बजावली आहे.