spot_img
अहमदनगरमै हु डॉन! गाण्यावर थिरकले आमदार रोहित पवार; भान ठेवा भान, विरोधकांनी...

मै हु डॉन! गाण्यावर थिरकले आमदार रोहित पवार; भान ठेवा भान, विरोधकांनी दिली प्रतिक्रिया, पहा व्हिडीओ..

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री:-
राष्ट्रवादीतील फुटीनंतर रोहित पवार आक्रमक झालेले दिसत आहेत. बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने आता रोहित पवारांवर पक्षात मोठी जबाबदारी आहे. आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यानंतर पवार कुटुंबियातून आणखी एक भावी मुख्यमंत्री पदाच्या रांगेत आले आहेत. दहीहंडी कार्यक्रमात जामखेडमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून आमदार रोहित पवार यांचे बॅनर झळकले तर याच वेळी दहिहंडी कार्यक्रमात मै हु डॉन गाण्यावर थिरकले रोहित पवार बाळ गोपाळ व कार्यकर्त्यांसह मनसोक्त थिरकले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

स्पर्धेसाठी १ लाख ११ हजार १११ रुपये प्रथम पारितोषिक ठेवण्यात आले होते. फलटण येथील जय हनुमान पथकाने पहिल्याच प्रयत्नात पारितोषिक जिंकले. कर्जत जामखेड मध्ये सालाबादप्रमाणे यावर्षीही आमदार रोहितदादा पवार मित्र मंडळाच्या वतीने भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जतमध्ये १ सप्टेंबरला दादा पाटील महाविद्यालयात तर जामखेडमध्ये काल २ सप्टेंबरला नागेश विद्यालयात दहीहंडी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यात आमदार रोहित भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांच्या हातात बॅनर होते याच वेळी मै हु डॉन गाण्यावर आमदार रोहित पवार बाळ गोपाळ व कार्यकर्त्यांसह मनसोक्त थिरकले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

ही दहीहंडी स्पर्धा कर्जत आणि जामखेडमध्ये झाली कर्जत मध्ये झालेल्या दहीहंडी स्पर्धेला मराठी सिने अभिनेत्री अमृता खानविलकर यांची खास उपस्थिती राहणार होती तर जामखेडमध्ये होणाऱ्या दहीहंडी स्पर्धेला मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि ऋता दुर्गुळे ह्या उपस्थित होत्या. कर्जत-जामखेडमध्ये होणाऱ्या दहीहंडी स्पर्धेसाठी १ लाख ११ हजार १११ रुपये प्रथम पारितोषिक ठेवण्यात आले होते. फलटण येथील जय हनुमान पथकाने पारितोषिक जिंकले.

रोहित पवारांनी भान ठेवले पाहिजे : मधुकर राळेभात
दहिहंडी कार्यक्रमात जामखेडमध्ये भावी मुख्यमंत्री रोहित पवार असे बॅनर झळकले. मै हूँ डॉन या गाण्यावर आमदार रोहित पवार स्वतः थिरकले होते. यावेळी प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी अनेकांनी मोठे योगदान दिले व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केले. आता पक्ष फुटला तरी या पक्षासाठी निष्ठेने योगदान देणाऱ्यांना सोडून अवघ्या ५ वर्षांपूर्वी अपघाताने आमदार झालेल्यांना थेट मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडत आहेत. आधी त्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून परत निवडून येण्याचे पहावे. त्यांनी या गोष्टीचे भान ठेवलं पाहिजे, असा टोला प्रा. राळेभात यांनी लगावला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पे अँड पार्कवरुन वादावादी!; किरण काळे म्हणाले, मागे घ्या, अन्यथा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शुक्रवारी सकाळची वेळ. सकाळीच नागरिकांमध्ये आणि मनपाचे कर्मचारी असल्याचे म्हणत पे...

आमदार जगताप यांचा शहरात सत्कार; म्हणाले, हिरवी वळवळ थांबवायची असेल तर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री लोकसभेच्या निवडणुकीत जातीत माणसे विभागली गेली होती. निवडणुकीच्या निकालानंतर सर्वत्र हिरवा...

१०४ ग्रॅम सोन्यावर डल्ला; प्रोफेसर चौकातील प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सोन्याचे दागिने तयार व दुरूस्ती करण्यासाठी दिलेले आठ लाख 30 हजाराचे...

भीषण स्फोटाने भंडारा हादरलं! ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट भंडारा | नगर सह्याद्री:- भंडाऱ्यामध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची...