spot_img
ब्रेकिंगमहायुतीचा 'गुरुवारी' फैसला! कुणाला मिळणार किती जागा? पहा

महायुतीचा ‘गुरुवारी’ फैसला! कुणाला मिळणार किती जागा? पहा

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
मुंबईत २८ मार्चला महायुतीची एकत्रित पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी कुणाला किती जागा मिळणार हे जाहीर केले जाईल. जागावाटपाचे आतापर्यंत ९९ टक्के काम पूर्ण झालेली आहे. आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळतील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली.

मीडियाशी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या, तेव्हा भाजपाच्या २३ जागा आल्या. शिवसेनेच्या १८ जागा आल्या, राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळाल्या. एक जागा नवनीत राणा यांची होती. त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. त्यामुळे आम्हाला फार कमी जागा

महाराष्ट्राचे बळ मोदीजींच्या पाठीशी उभे करू : पवार
राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांचे नाव राज्यातील लोकसभा प्रचारक म्हणून जाहीर करण्यात आले असून अन्य स्टार प्रचारकांच्या नावावर चर्चा सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. लोकांचा विश्वास आम्ही जिंकू आणि नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राचे बळ त्यांच्या पाठीशी उभे करू, असा निर्धार व्यक्त करत, जाहीरनाम्यावर काम सुरू आहे. लवकरच तो दिला जाईल. स्थानिक प्रश्न जाहीरनाम्यात यावेत अशी भूमिका आहे, असे अजित पवार यांनी मीडियाही बोलताना माहिती दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीरामपूर: नगराध्यक्ष पदासाठी चौघांची एन्ट्री, तर नगरसेवक पदासाठी दहा उमेदवार रिंगणात ; कोणी केले अर्ज सादर?

श्रीरामपूर / नगर सह्याद्री नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शहरात उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून...

नगर–मनमाड महामार्गावर अग्नितांडव! लक्झरी बस–कारची भीषण धडक; कारचालक जळून ठार

अहिल्यानगर / नगर सह्याद्री – नगर–मनमाड महामार्गावर कोपरगावजवळील भास्कर वस्ती येथे शुक्रवारी (14 नोव्हेंबर)...

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर आता २० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी ​दुबार नावांचा...

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश ९ फेब्रुवारीपर्यंत अहवाल...