spot_img
अहमदनगरदुभाजकावर पिकअप धडकली, नागरिक मदतीला धावले पण सर्वच थबकले, कारण काय? तीन...

दुभाजकावर पिकअप धडकली, नागरिक मदतीला धावले पण सर्वच थबकले, कारण काय? तीन गुन्हेगार अडकले जाळ्यात

spot_img

सुपा। नगर सह्याद्री-
दुभाजकावर पिकअप धडकून पलटली.. नागरिकांसह पोलीस मदतीला धावले.. पण वास्तव समोर येताच सर्वच थबकले.अपघातग्रस्त तिघे हे गुन्हेगार होते व ते आयते पोलिसांच्या हाती आले. हा प्रकार घडलाय पारनेर तालुयातील नारायणगव्हाण शिवारात.

अधिक माहिती अशी : रविवार दिनांक २४ मार्च रोजी सकाळी ११ च्या दरम्यान एक पांढर्‍या रंगाची पिकअप गाडी अहमदनगर पुणे महामार्गाने अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने जात होती. नारायणगव्हाण शिवारातील राज्यस्थानी धाब्याजवळ चालकाच्या चुकीमुळे गाडी रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाली. व त्यामध्ये असलेले चालकासह तीघे जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी त्यांना मदत करत सुपा पोलिसांना पाचारण केले. सुपा पोलिस घटनास्थळी आले तेव्हा त्यांनी पाहिले तर त्यात दहा गोण्यामध्ये भरलेले गोमांस आढळले. सुपा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत गाडीसह मुद्देमाल ताब्यात घेतला. त्या गाडीतील तिघांनाही ताब्यात घेतले.

घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अरुण आव्हाड यांच्यासह सफौ एस. एन. कुटे व पोहेकाँ एस.बी. चौधरी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पिकअपमधील आरोपी नईम कदीर कुरेशी (रा.बंगाल चौकी, अहमदनगर), अफजान अब्दुल कुरेशी (रा.सुभेदार गल्ली, झेंडी गेट, अहमदनगर), अल्ताफ यासिन कुरेशी या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे ३७ हजार ५०० रुपयांचे गोवंश मांस, दीड लाखांची पिकअप असा एकूण १ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

सुपा पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेत बेकायदेशीर गोमांस विक्री व रस्ता वाहतूक तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक आरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ एसबी चौधरी हे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...