spot_img
अहमदनगरखासदार विखेंच्या स्टेजवर भोसले, कळमकर! निवडणुकीच्या तोंडावर चर्चांना उधाण

खासदार विखेंच्या स्टेजवर भोसले, कळमकर! निवडणुकीच्या तोंडावर चर्चांना उधाण

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री-
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार सुजय विखे विरुद्ध आमदार नीलेश लंके अशी लढत होण्याची मोठी शयता निर्माण झाल्यामुळे दोन्ही उमेदवारांकडून निवडणूक मोर्चे बांधणी जोरात सुरू आहे. खासदार सुजय विखे यांनी पारनेर तालुयाचे दौरे मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त खासदार सुजय विखे यांनी पारनेर तालुयात मोठे शक्ती प्रदर्शन केले. दरम्यान या सोहळ्यात खासदार सुजय विखे यांच्या समवेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते रामदास भोसले, राष्ट्रवादी युवक काँगेसचे तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर दिसून आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

या कार्यक्रमानिमित्ताने खासदार यांनी तालुयातील जवळपास सगळ्याच पुढार्‍यांना एकाच व्यासपीठावर आणले होते. आमदार लंके यांना तालुयातच रोखण्यासाठी खासदार विखे यांनी आता कंबर कसली आहे. सरपंच पंकज कारखिले यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत विखेंच्या माध्यमातून राळेगण थेरपाळ येथे मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले या कार्यक्रमासाठी दहा हजारापेक्षा जास्त जनसमुदाय उपस्थित होता.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अहमदनगर उपजिल्हाप्रमुख निघोज भागाचे नेते रामदास भोसले व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे पारनेर तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर हे सरपंच पंकज कारखिले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत खासदार सुजय विखे यांच्या व्यासपीठावर दिसल्यामुळे तालुयात आता राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण महाविकास आघाडीतील तालुयातील मोठे नेते ते समजले जातात.

अलीकडेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आळकुटी भागाचे नेते डॉ. भास्कर शिरोळे यांची सुद्धा खासदार विखे यांनी भेट घेत बंद दाराआड चर्चा केली होती. तसेच पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे यांनी सुद्धा खासदार विखे यांची गुप्त भेट घेतल्याची तालुयात सुप्त चर्चा आहे. त्यामुळे आ. लंके गटातील अनेक नेते खासदार विखे यांच्या संपर्कात असल्याने नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात खासदार विखे यांच्यासमोर उमेदवार म्हणून आमदार लंके असले तरी त्यांना तालुयात मोठे मताधिय मिळवताना कसरत करावी लागणार आहे.

राळेगण थेरपाभ येथे सरपंच पंकज कारखिले यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार सुजय विखे यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते सर, पारनेर नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष विजुभाऊ औटी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे, निघोज जिल्हा परिषद गटाचे सचिन पाटील वराळ, अण्णा हजारे यांचे माजी स्वीसहाय्यक सुरेश पठारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे पारनेर तालुका अध्यक्ष विक्रम कळमकर, आदी मातब्बर नेते यावेळी खासदार सुजय विखे यांच्या व्यासपीठावर दिसून आले. रामदास भोसले व विक्रम कळमकर यांच्या उपस्थितीने राजकीय जाणकारांच्या यावेळी भुवया उंचविल्या होत्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...