spot_img
अहमदनगरकर्जत-जामखेडमध्ये महाविकास आघाडीला धक्का; कोणी सोडला पक्ष पहा...

कर्जत-जामखेडमध्ये महाविकास आघाडीला धक्का; कोणी सोडला पक्ष पहा…

spot_img

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड. कैलास शेवाळे यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश
कर्जत / नगर सह्याद्री –
कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आणि तालुक्यातील ज्येष्ठ नेते ऍड कैलास शेवाळे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. आता हे सर्वजण कर्जत-जामखेडमधील महायुतीचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारात सक्रीय झाले आहेत. तालुक्यातील साखर कारखाना, जिल्हा परिषद आणि अन्य माध्यमातून राजकारणात दीर्घकाळ सक्रीय असलेले ऍड शेवाळे यांच्यासोबत अनेक गावांतील सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आमदार रोहित पवार मित्र पक्षांना विश्वासात घेत नाहीत, असा आरोप सुमारे वर्षभरापासूनच करण्यास सुरवात झाली. त्यावरून पत्रकबाजी, आरोपप्रात्यारोप झाले. निवडणूक जाहीर झाल्यावर बंडखोरीही झाली. पक्षाच्या आदेशानुसार अर्ज मागे घ्यावे लागल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आता थेट पक्षांतरच केले आहे. ते सर्वजण आता महायुतीचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारात सक्रीय होत आहेत. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

कर्जत जामखेडमध्ये आमदार पवार यांना मित्र पक्षातील काही सहकाऱ्यांकडून विरोध सुरू झाला आहे. स्वपक्षीयांचाही छुपा विरोध आहे. काँग्रेस आणि शिवसेनेने उघड विरोध करीत जागा वाटपात ही जागा मिळण्याची मागणी केली होती. एवढेच नव्हे तर यावेळी पवार पुन्हा निवडून येणार नाहीत, असेही त्यांच्याकडू वरिष्ठांना सांगितले गेले होते. मात्र, निर्णय बदलला नाही. पवार यांनाच उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शेवाळे यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला. मात्र, महाविकास आघाडीकडून बंडखोरी थांबविण्यासाठी वरिष्ठांकडून सूचना आल्या. त्यामुळे शेवाळे यांना माघार घ्यावी लागली.
त्यानंतर महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांच्या पुढाकारातून शेवाळे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. रविवारी सायंकाळी या सर्वांनी नागपूर गाठले. तेथे फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्व भूमिपुत्रांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाल्याने कर्जत-जामखेडच्या विकासाला व सामूहिक प्रगतीला नक्कीच एक नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड कैलास शेवाळे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक हर्ष काका शेवाळे, गोकुळ इरकड, सतीश भंडारे, किरण पावणे, हनुमंत जगदाळे, नामदेव दिलीप लाड, भरत चव्हाण, महादेव शिंदे, गजानन लाड, सतीश डुकरे, अविरज लाड, नवनाथ डुकरे, परसु लाड, किरण शेवाळे, संभाजी मंडलीक, राहुल बाबर, रोहन रोकडे या विविध गावांच्या सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मुंबई । नगर सहयाद्री  राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...