spot_img
अहमदनगरराष्ट्रीय अंजिक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहिर : नगरच्या 'या' तीन खेळाडूंचा...

राष्ट्रीय अंजिक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहिर : नगरच्या ‘या’ तीन खेळाडूंचा सहभाग

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री –
नगर येथील वाडिया पार्कच्या मैदानावर दि .२१ मार्च ते दि. २४ मार्च दरम्यान होत असलेल्या ७० व्या वरिष्ठ पुरूष गट राष्ट्रीय अंजिक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ आज मुख्य प्रशिक्षक तथा अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव व सहायक प्रशिक्षक दादासाहेब आव्हाड यांनी जाहीर केला . यात नगर मधील तीन खेळाडूंचा सहभाग आहे.

याबाबत अधिक माहिती देताना मुख्य प्रशिक्षक शांताराम जाधव म्हणाले की , नगर येथे दि .२१ मार्च पासुन ७० वी वरिष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा होत असुन यात महाराष्ट्राचा संघ निवडण्यासाठी नगर येथे दि .१० मार्च पासुन निवड चाचणीसाठी सराव शिबीर घेण्यात आले . यात राज्यातील २६ खेळाडू सहभागी झाले होते . या सराव शिबीरात खेळाडूंचा फिटनेस , मागील राष्ट्रीय व राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरी या सर्व निकषांच्या आधारावर महाराष्ट्राचा १२ खेळाडूंचा अंतिम संघ निवडण्यात आला . यासाठी राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार , कार्याध्यक्ष गजानन किर्तीकर, उपाध्यक्ष सुनील तटकरे यांचेही मार्गदर्शन घेण्यात आले असे जाधव यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे मुख्य आयोजक तथा राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा .शशिकांत गाडे उपस्थीत होते .
निवडण्यात आलेला महाराष्ट्राचा संघ असा : हर्ष महेश लाड ( मुंबई) , किरण लक्ष्मण मगर ( नांदेड) , संकेत सुरेश सावंत ( मुंबई) , अरकम सादिक शेख ( मुंबई उपनगर), मयूर जगन्नाथ कदम (रायगड), प्रणय विनय राणे (मुंबई), शंकर भीमराज गदई ( अहमदनगर ),असलम मुस्तफा इनामदार ( ठाणे),आकाश संतोष शिंदे ( नाशिक), आदित्य तुषार शिंदे ( अहमदनगर), ओंकार दिपक कुंभार ( रत्नागिरी), सौरभ चंद्रशेखर राऊत ( अहमदनगर )
राखीव खेळाडू : निखील अर्जुन शिंदे (नंदुरबार ), तेजस मारूती पाटील ( कोल्हापुर), अभिषेक प्रकाश नर ( मुंबई उपनगर).

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संदीपदादा कोतकर विचार मंच महापालिकेसाठी ऍक्टिव्ह! ‘ते’ अभियान राबवत निवडणुकीची तयारी..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२५ मध्ये होतील असे...

देवेंद्रजी, लाडक्या बहिणी अन्‌‍ त्यांच्या लेकीबाळी राज्यात असुरक्षित झाल्यात!

सारिपाट | शिवाजी शिर्के:- लोकसभा अन्‌‍ त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकांचा धुराळा खाली बसत असताना आणि...

कृतनिश्चयी प्रधानसेवक!

Former Prime Minister Manmohan Singh : साधारण 2012 पासून, त्या वेळी पंतप्रधान पदावर असलेले...

बीडच्या घटनेची पुनरावृत्ती! सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रकार

Maharashtra Crime News: मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे बीड जिल्ह्यातलं राजकारण तापलं...